Wednesday, September 2, 2026

Geeta Nagar Cha Maharaja accident : 'गीतानगरचा महाराजा' आगमन सोहळ्यात अपघात; २ टनांच्या ट्रॉलीखाली येऊन चिमुकली गंभीर जखमी

Geeta Nagar Cha Maharaja accident : 'गीतानगरचा महाराजा' आगमन सोहळ्यात अपघात; २ टनांच्या ट्रॉलीखाली येऊन चिमुकली गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील दक्षिण कुलाबा (Coolaba News) येथील प्रसिद्ध 'गीतानगरचा महाराजा' (Geetanagarcha Maharaja) गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यादरम्यान एका अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत एका चिमुकल्या मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघात कसा घडला ?

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मिळालेल्या माहितीनुसार, गीतानगरच्या महाराजाची सुमारे २ टनांची भव्य गणेशमूर्ती ट्रॉलीवरून अत्यंत वेगाने घेऊन जात असताना हा प्रकार घडला. आगमन सोहळ्यातील उत्साहाच्या भरात ट्रॉली ओढणाऱ्या कार्यकर्त्यांचा वेग जास्त असल्याने आणि रस्त्यावरील गर्दीमुळे एका लहान मुलीला बाजूला होण्यास वेळ मिळाला नाही. ट्रॉलीचा धक्का लागल्यामुळे ती मुलगी थेट अनियंत्रित ट्रॉलीच्या चाकाखाली आली. घटना घडताच उपस्थितांनी तातडीने आरडाओरड करत ट्रॉली थांबवली आणि प्रसंगावधान राखून मुलीला ट्रॉलीखालून बाहेर काढले.

मुलीची सद्यस्थिती

अपघातानंतर तात्काळ मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्यामुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता, गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे बेभान होऊन ट्रॉली वेगाने ओढल्याबद्दल नागरिकांमधून आणि सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आगमन सोहळ्यात डिजेचा आवाज आणि प्रचंड उत्साहात सुरक्षेकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे निष्पापांचा जीव धोक्यात येत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना आगमना दरम्यान ट्रॉलीचा वेग नियंत्रित ठेवण्याच्या व सुरक्षेच्या कडक सूचना दिल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >