Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानाचे आगमन

‘अँटोनोव्ह एएन-१२४’ द्वारे ४६ टन मालाची यशस्वी वाहतूक


नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) प्रगतीमध्ये आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जगातील सर्वात मोठ्या उत्पादनक्षम मालवाहू विमानांपैकी एक असलेल्या 'अँटोनोव्ह An-124 ‘रुस्लान’ (Antonov An-124 Ruslan) या महाकाय विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग झाले. कोड F श्रेणीतील हे रुंद आकाराचे मालवाहू विमान अवजड, आकाराने मोठ्या आणि विशेष स्वरूपाच्या मालाची वाहतूक करण्यासाठी सक्षम आहे. अबुधाबीहून सुमारे ४६ टन माल घेऊन आलेल्या या विमानाच्या आगमनातून NMIAची मोठी व विशेष मालवाहू विमाने हाताळण्याची तसेच गुंतागुंतीच्या कार्गो ऑपरेशन्सना सक्षमपणे सहाय्य करण्याची क्षमता अधोरेखित झाली.


'अँटोनोव्ह एएन-१२४' हे विमान विशेषतः अत्यंत अवजड आणि अवाढव्य आकाराच्या (Oversized and Heavy Cargo) मालाची वाहतूक करण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या विमानाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याचा पुढील भाग (नोझ डोअर) संपूर्णपणे वरच्या बाजूला उघडता येतो. या तांत्रिक सुविधेमुळे मोठ्या आकाराच्या यंत्रसामग्रीची आणि अवजड वस्तूंची चढ-उतार करणे अत्यंत सोपे व सुरक्षित होते.



या महाकाय विमानाचे सुरक्षित आगमन आणि उतरवलेला ४६ टन माल, यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. अत्यंत मोठी आणि विशेष श्रेणीतील मालवाहू विमाने हाताळण्यासाठी हे विमानतळ पूर्णपणे सज्ज असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. तसेच, येथील अत्याधुनिक कार्गो सुविधा, धावपट्टीची क्षमता आणि प्रगत लॉजिस्टिक्स यंत्रणा किती सक्षम आहे, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर जागतिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे (Global Cargo Hub) एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास या यशस्वी लँडिंगनंतर व्यक्त केला जात आहे.


Comments
Add Comment

Obsession Movie: एक इच्छा आणि आयुष्याला अनपेक्षित वळण! काय आहे व्हायरल One Wish Willow?

चित्रपटात जर हॉरर सीन्स असतील तर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढते. त्या भूकिमिकेबद्दल कुतूहल निर्माण होते.

Koffee With Karan 9: रश्मिका विजयच्या पाठी लग्नासाठी हात धुवून पाठी लागलेली, स्वत: अभिनेत्रीनेच केला शॉकिंग खुलासा

मुंबई: करण जोहरचा सुप्रसिद्ध चॅट शो, 'कॉफी विथ करण' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या ह्या शोचा नऊवा सीझन सुरू आहे.

‘रणबाली’ची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवशी किती कमाई?

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा 'रणबाली' या चित्रपटाच्या देशांतर्गत कमाईत

OTT वर नव्या रोमँटिक कॉमेडीचा धुमाकूळ! 6 भागांची सिरीज टॉप 10 मध्ये

दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही ना काही नवीन प्रदर्शित होत असतं. रोमँटिक सिनेमा किंवा सिरीज हे

Neeti Mohan: प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नीती मोहनवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं छत्र हरपलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नीती मोहनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गायिका नीती मोहन, कॉरियोग्राफर शक्ती मोहन

आता तिकीट बुकिंग होणार सोपी! 'या' गाड्यांचे PNR नंबर्स बदलणार

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या तिसऱ्या