डेहराडून : चारधाम यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात केदारनाथ धामला जाणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा १५ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाने (यूसीएडीए) यासाठी तयारी वेगाने सुरू केली असून, पहिली तिकीट बुकिंग विंडो ७ सप्टेंबरपासून उघडण्याची तयारी आहे.
मुंबई : गणेशोत्सव जवळ येताच मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांची गावाकडे जाण्यासाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. गणपती बाप्पाच्या ...
यूसीएडीएच्या माहितीनुसार, तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि बुकिंग व्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात १५-१५ दिवसांच्या कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्राधिकरणाने हेलिकॉप्टर ऑपरेटरसोबत आवश्यक बैठका घेतल्या आहेत. तसेच नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि हवामान विभागासोबतही समन्वय साधला जात आहे.
अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यातील लष्करी संघर्ष आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. मध्यपूर्वेत शांततेसाठी मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न सुरू ...
यूसीएडीएने सांगितले की, हेलिकॉप्टर सेवेचे संचालन हवामानाची परिस्थिती, सुरक्षा मानके आणि डीजीसीएच्या परवानगीच्या अनुषंगानेच केले जाईल. प्राधिकरणाने भाविकांना केवळ अधिकृत माध्यमातूनच तिकीट बुक करण्याचे आवाहन केले आहे. केदारनाथ शटल सेवेसाठी heliyatra.irctc.co.in आणि बद्रीनाथ शटल सेवेसाठी helitaxii.com चा वापर करण्यास तसेच अनधिकृत एजंट आणि मध्यस्थांकडून तिकीट खरेदी न करण्यास सांगितले आहे. चारधाम यात्रेच्या पहिल्या टप्प्यात गुप्तकाशी, फाटा आणि सिरसी येथील हेलिपॅडवरून आठ हेलिकॉप्टर ऑपरेटरच्या माध्यमातून केदारनाथसाठी सेवा चालवण्यात आली होती. या कालावधीत सुमारे ६७ हजार भाविकांनी हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेतला.






