China Masters : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात

शेन्झेन : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे चायना मास्टर्समधील आव्व्हान संपुष्टात आले आहे. लक्ष्यला कॅनडाच्या व्हिक्टर लाईकडून १४-२१, ७-२१ अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे, यावर्षी लाईविरुद्ध लक्ष्य सेनचा रेकॉर्ड आणखी खालावला आहे. २०२६ मध्ये या दोघांमध्ये झालेल्या चार सामन्यांपैकी तीन वेळा लाईने विजय मिळवला आहे. त्याने थॉमस कपमध्ये आणि जुलैमध्ये झालेल्या चायना ओपनमध्येही पराभूत केले होते. मात्र, यावर्षी झालेल्या त्यांच्या पहिल्या सामन्यात लक्ष्यने विजय मिळवला होता. मार्चमध्ये झालेल्या ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्य फेरीत लक्ष्यने लाईला तीन गेमच्या सामन्यात २१-१६, १८-२१, २१-१५ असे पराभूत केले होते.



लक्ष्य सेनसाठी ही सलग दुसरी निराशाजनक स्पर्धा होती. नवी दिल्लीत झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये तो अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून दुसऱ्या फेरीत पराभूत झाला होता. चायना मास्टर्समध्ये, तो सुरुवातीला फ्रान्सच्या ॲलेक्स लॅनिएरविरुद्ध खेळणार होता, पण दिल्लीत विजेतेपद जिंकल्यानंतर लॅनिएरने माघार घेतल्यामुळे, लक्ष्याचा सामना पुन्हा एकदा लाईशी झाला.



आणखी एका सामन्यात किदाम्बी श्रीकांतने शानदार कामगिरी करत ची यु-रेनला २१-१६, २१-१५ असे पराभूत करून पुढील फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने पहिल्या गेमवर वर्चस्व गाजवले आणि दुसऱ्या गेममध्ये संयम राखत विजय मिळवला. यु-रेनने २०२३ मध्ये सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत आपले पहिले बीडब्ल्यूएफ विजेतेपद पटकावले होते, त्याच स्पर्धेत त्याने पहिल्या फेरीत श्रीकांतला पराभूत केले होते. यावेळी श्रीकांतने या परभावाचा वचपा काढला.मिश्र दुहेरीच्या ३२ जणांच्या फेरीत, भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी थायलंडच्या टोनकिड साहेंग आणि टोनरग साहेंग यांचा २१-८, २१-९ असा

Comments
Add Comment

IND vs WI : भारत वेस्ट इंडिज मालिकेचा नकोसा शेवट, भारताने 7.4 षटकात 118 धावा करूनही सामना ड्रा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. चार सामन्यानंतर 2-2 अशी स्थिती होती.

महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्स मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, IPL 2027 च्या स्पर्धेत मुख्य प्रशिक्षकपदाचा शर्यतीत कोण?

मुंबई: IPL 2027 च्या आधी मुंबई इंडियन्स टीमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने

IPL 2027 : आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! श्रीलंकेचा हा दिग्गज गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त

IPL 2027 : आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघबांधणीत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. श्रीलंकेचे माजी

Hong Kong Sixes 2026 : कृणाल पांड्याकडे भारताची धुरा, 'हा' स्टार खेळाडू तब्बल 4 वर्षांनंतर थेट राष्ट्रीय संघात परतला!

हाँगकाँग सिक्सर्स 2026 (Hong Kong Sixes 2026) क्रिकेट स्पर्धेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 30 ऑक्टोबर ते 1

Yashasvi Jaiswal ODI Snub : यशस्वी जयस्वालला वनडे संघातून डावललं! आर. अश्विन संतापला; निवडकर्त्यांना सुनावलं, म्हणाला ‘हा अन्याय!’

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी न मिळाल्याने

Wasim Jaffer : टीम इंडियाला मिळणार नवा मुख्य निवडकर्ता? 31 कसोटी खेळलेल्या दिग्गजाचे नाव चर्चेत; BCCI च्या निर्णयाकडे लक्ष!

Wasim Jaffer : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. भारताकडून 31 कसोटी