सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. एक सदस्यीय चौकशी आयोगाच्या अहवालानंतर राज्याच्या गृह विभागाने पुढील कारवाईचा मसुदा तयार करण्यासाठी उच्चस्तरीय छाननी समितीची स्थापना केली आहे. ( Sampada Munde suicide)
23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणमधील मधुदीप हॉटेलमध्ये डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली होती. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांना आपल्या आत्महत्येस जबाबदार धरल्याचे या नोटमध्ये नमूद असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गोपाल बदने यांचे निलंबन करण्यात आले होते.
दिल्ली : राजस्थानातील कोटा येथील 15 वर्षीय तन्वी परियानी हिचा दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. जन्मजात ...
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली 2 डिसेंबर 2025 रोजी एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन केला होता. आयोगाने सविस्तर चौकशी करून आपला अंतिम अहवाल 29 मे 2026 रोजी शासनाकडे सादर केला. (Sampada Munde)
आता या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशींच्या आधारे शासनाने कोणती कारवाई करावी, याचा मसुदा तयार करण्यासाठी गृह विभागाने 1 सप्टेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी करत उच्चस्तरीय छाननी समिती स्थापन केली आहे. (Phaltan Sub-District Hospital)
दरम्यान, फलटणमधील आणखी एक प्रकरण चर्चेत आले आहे. रुग्णालयातील वरिष्ठांच्या कथित छळाला कंटाळून डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईतील सायन परिसरातील एका टॉवरवरून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. संपदा मुंडे प्रकरणातील शासनाच्या पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे. ( Home Department)






