Nashik Crime : येवल्यात जुन्या वादातून माय-लेकीवर कुऱ्हाडीने हल्ला, आरोपी दोन तासांत जेरबंद

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील येवला (Yeola) तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथे जुन्या वादाची कुरापत काढून प्रवीण ऊर्फ सोन्या अशोक जाधव याने शेजारी राहणाऱ्या संगीता कोळी व त्यांची मुलगी जयश्री कोळी यांच्यावर शेतात गवत कापत असताना कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जयश्री यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) हलवण्यात आले आहे, तर संगीता कोळी यांच्यावर येवल्यात उपचार सुरू आहेत.



आरोपीवर यापूर्वीही पीडितांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला होता आणि तो जामिनावर बाहेर आला होता. घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलीस (Yewla Taluka Police) निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार माळोदे व पथकाने अवघ्या दोन तासांत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Sindhudurg Crime: शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी मुंबईला जाण्याचं स्वप्न अधुरं; कुडाळमध्ये एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची हत्या

कुडाळ तालुक्यातील कडावल वर्दे रस्त्यावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची हत्या

Hiware Bazar: पाण्याचा ताळेबंद मांडणारे हिवरे बाजार देशात पहिले

नगर (प्रतिनिधी) : आदर्श गाव हिवरे बाजार येथे नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या

Raj Babbar: ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर दिवंगत पत्नीच्या आठवणीत भावूक; म्हणाले, "...तिची प्रचंड आठवण येतेय"

मुंबई: दिवंगत प्रसिद्ध मराठमोळी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांची काल 71 वी जयंती होती. स्मिता पाटील आज

Beed Accident : तुळजापूरला चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात

बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Ramayan: रामायण 'राइज ऑफ अ लिजेंड' रचणार इतिहास! भारतासाठी ठरला अभिमानाचा क्षण

भारतासाठी अभिमानाचा क्षण! भारतीय सिनेमाचा भव्य आविष्कार आणि दिवाळीचा उत्साह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत,