Sonu Sood : ‘संकटात नेहमी मदतीचा हात!’ अभिनेता सोनू सूद नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला!

नेपाळमध्ये आलेल्या भीषण (Nepal Flood) पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेक लोकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत, तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. अशा कठीण काळात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) थेट नेपाळमध्ये पोहोचला आहे. त्याने पीडित लोकांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे.



"नेपाळ, तुम्ही एकटे नाही आहात"


सोनू सूदने सोशल मीडियावर तेथील लोकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तो म्हणाला, "या लोकांनी आपली घरं आणि कुटुंब गमावलं आहे. पण आपण सगळे मिळून त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करू. नेपाळ, तुम्ही या संकटात एकटे नाही आहात." सोनूने सांगितलं की, तो भारतातून खाद्यपदार्थ, ब्लँकेट्स आणि इतर गरजेचं सामान घेऊन आला आहे. ही मदत पुढेही सुरूच राहील, असं आश्वासन त्याने दिलं. सोनू सूदच्या या कामामुळे लोक सोशल मीडियावर त्याचं खूप कौतुक करत आहेत. "पडद्यावरचा व्हिलन पण खऱ्या आयुष्यातला हिरो!", "भारताला तुमचा अभिमान आहे" अशा कमेंट्स करून लोक त्याला दाद देत आहेत.



इतर कलाकारांचे आवाहन


 या नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिने आंतरराष्ट्रीय समुदायाला नेपाळच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तसेच अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा यांनी नेपाळला आपली 'मातृभूमी' संबोधत संपूर्ण बॉलिवूडने नेपाळच्या पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी विनंती केली आहे.



नेपाळमधील महापुराची सद्यस्थिती


२६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे नेपाळमध्ये मोठे संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण व व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDRRMA) माहितीनुसार, या अपत्तीमध्ये तब्बल ९३९ लोकांचा मृत्यू झाला असून ३,९२५ लोक अद्याप बेपत्ता आहेत (ज्यात ५९२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे). रसुवा आणि नुवाकोट यांसारख्या भागांत सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, भारतीय दूतावासाने मृत पावलेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्यासाठी विशेष मदत कक्ष सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Air Vice Marshal Shakti Sharma : महिला शक्तीचा नवा अध्याय! शक्ती शर्मा यांची एअर व्हाइस मार्शलपदी ऐतिहासिक बढती

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या इतिहासात महिला अधिकाऱ्यांसाठी नवा अध्याय सुरू झाला आहे. एअर व्हाइस मार्शल शक्ती

Air India Express new Look : एअर इंडिया एक्सप्रेसचा भन्नाट मेकओव्हर! भारतीय वस्त्रपरंपरेची खास झलक!

एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) आपल्या केबिन क्रू आणि विमानतळावरील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आणि अत्यंत

Mamata Banerjee Niece : ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात मृतदेह आढळला; पोलिसांकडून तपास सुरू

बीरभूम : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबातील ३१

Odisha Heavy Rainfall : ओडिशात मुसळधार पावसाचा कहर; भिंती कोसळून ३ जणांचा मृत्यू, ३ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश

भुवनेश्वर : ओडिशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी भिंती कोसळण्याच्या

Delhi News : दोन वर्षापासून हृदयविकाराशी झुंज; 15 व्या वर्षी AIIMSमध्ये तन्वीचा मृत्यू

दिल्ली : राजस्थानातील कोटा येथील 15 वर्षीय तन्वी परियानी हिचा दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या