US Iran war news : ‘मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका!’ अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; प्रत्युत्तर म्हणून इराणकडून अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा

अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यातील लष्करी संघर्ष आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. मध्यपूर्वेत शांततेसाठी मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच अमेरिकेने इराणच्या मुख्य भूमीवर जोरदार बॉम्बहल्ला चढवला. अमेरिकन सेंट्रल कमांडच्या (CENTCOM) माहितीनुसार, इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'च्या (IRGC) लष्करी तळांना आणि सागरी पट्ट्याला लक्ष्य करून ही मोठी कारवाई करण्यात आली. होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर इराणकडून होणारे हल्ले आणि अमेरिकन सैन्याला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नांना उत्तर देण्यासाठीच हा आक्रमक पवित्रा घेण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.



दक्षिण इराण क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हादरला; नौदल अन् रडार स्टेशन उद्ध्वस्त




अमेरिकन युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी दक्षिण तसेच आग्नेय इराणमधील सागरी किनारपट्टीवर एकाच वेळी क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. चाबहार, बंदर अब्बास, कोनारक, केशम बेट, जास्क, सिरिक आणि मिनाब यांसारख्या अत्यंत संवेदनशील भागांवर हे हवाई हल्ले झाले. या भीषण स्फोटांमुळे इराणचा संपूर्ण किनारपट्टीचा भाग थरारून गेला. सेंटकॉमच्या दाव्यानुसार, या कारवाईत आयआरजीसीच्या हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense Sites), रडार स्टेशन, नौदल तळ, सागरी सुरुंग पेरण्याची ठिकाणे आणि दळणवळण केंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.



इराणचा प्रतिहल्ला; जॉर्डन, इराक अन् कुवेतमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्रे


अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणनेही तात्काळ आक्रमक प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. आयआरजीसीने जॉर्डनमधील अमेरिकन मरीन कॉर्प्सच्या 'कॅम्प टिटिन' तळावर आणि प्रिन्स हसन एअरबेसवर अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यासोबतच इराकच्या इरबिल भागातील अमेरिकन लष्करी तळावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले चढवण्यात आले. कुवेतच्या हवाई हद्दीतही संशयास्पद इराणी ड्रोन्स घुसल्याने तेथील सायरन वाजवून अलर्ट जारी करण्यात आला. जॉर्डनच्या लष्कराने इराणची बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला असून, या प्रतिहल्ल्यात अमेरिकन सैन्याची कोणतीही जीवितहानी झालेली नाही.



कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या; जागतिक बाजारात युद्धाची भीती


गेल्या महिनाभरापासून दोन्ही देशांत काहीशी शांतता होती, मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीत खनिज तेलाच्या टँकर्सवर झालेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती पुन्हा बिघडली. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक याच मार्गावरून होते, जिथे इराणने सागरी सुरुंग लावून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या ताज्या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ४ डॉलरने वाढले असून, पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मोठ्या युद्धाचे सावट निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

White House : अवघ्या पाच दिवसांत केटी झकारिया यांची व्हाइट हाऊसमधून एक्झिट; बार परीक्षा वादामुळे पद गमावले!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून

Singapore Haze 2026 : इंडोनेशियातील आगीचा सिंगापूरला फटका; प्रदूषणावर कंपन्यांवर होणार कारवाई?

सिंगापूर : इंडोनेशियातील जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या धुरामुळे शेजारील सिंगापूरमधील हवा अत्यंत विषारी

Trump Ukraine : ट्रम्प यांचा युक्रेनला दुहेरी धक्का! रशियाकडून तेल खरेदी अन् स्टारलिंकवर निर्बंध?

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देत अमेरिकेने युक्रेनला एकाच वेळी दोन मोठे धक्के दिले आहेत.

Yemen Attack : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका? येमेनमधील राजवाड्यावरील हल्ल्याने खळबळ

सना : मध्यपूर्वेतील भू-राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा तीव्र उधाण आले असून, येमेनमध्ये हुती बंडखोरांनी थेट

रशियात शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका आहे का, किती नुकसान झाले?

मॉस्को : रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प परिसरात शुक्रवारी भूकंपाचे अत्यंत तीव्र धक्के जाणवले.

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत