- अमित ठाकरेंविरोधात भाजयुमोने केलेल्या आंदोलनावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नापसंती
मुंबई : मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्यानंतर भाजयुमोने केलेल्या आंदोलनावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जाहीर नापसंती व्यक्त केली आहे. "काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण त्या विरोधात आंदोलन करतो, हे चुकीचे आहे," अशा शब्दांत चव्हाण यांनी पक्षाच्या युवा मोर्चाला सुनावले आहे. मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर व्यासपीठावरून त्यांनी ही भूमिका मांडली.
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी ...
पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यास सांगितल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) मंगळवारी मुंबईतील माहिम भागात आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनादरम्यान भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. या वादात पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकडही केली होती.
या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "मला युवाशक्तीला अडचणीत आणायचे नाही, आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे, त्यांना गुंड म्हणून तयार करायचे नाही," असे स्पष्ट करत चव्हाणांनी अशा प्रकारच्या आंदोलनांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली.