टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन यांच्या वैवाहिक नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चारूने राजीववर लग्नादरम्यान फसवणूक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या नात्यात आलेल्या अडचणींबाबत अनेक धक्कादायक दावे सांगितले आहेत. (Charu Asopa)
चारू आणि राजीव यांनी 2019 मध्ये लग्न केले. 2021 मध्ये त्यांना झियाना ही मुलगी झाली. मात्र, मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात अनेकदा वाद, दुरावा आणि पुन्हा समेट झाल्याचे समोर आले. अखेर जून 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
डहाणू रेल्वे स्थानकावरून पहाटेच्या सुमारास बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या डहाणू-बोरिवली मेमू रेल्वेमध्ये 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर हल्ल्याचा ...
चारूने दावा केला की, राजीव तिला न सांगता दिल्लीला गेला होता. त्यानंतर त्याच्या बॅगेत तिला कथित अफेअरशी संबंधित वस्तू सापडल्याचा दावा तिने केला. “मला त्याच्या बॅगेत कंडोम सापडले,” असे चारूने मुलाखतीत सांगितले. (Charu Asopa And Rajeev Sen)
चारूने पुढे आरोप केला की, ती गरोदर असतानाही राजीव बराच वेळ घराबाहेर राहायचा. ती मुंबईत असताना राजीव तासनतास बाहेर असायचा आणि उशिरा घरी परतायचा. कधी गाडीत झोपल्याचे, तर कधी वाहतूक कमी होईपर्यंत वांद्रे येथील कॅफेमध्ये बसल्याचे कारण तो देत असल्याचे चारूने सांगितले.
याशिवाय चारूने राजीववर शारीरिक छळाचा आरोपही केला. या प्रकरणात आपण पोलिसांना बोलावून तक्रार दाखल केल्याचे तिने सांगितले. राजीवने माफी मागितल्यानंतर आपण त्याला अनेकदा माफ केले, कारण त्याच्यावर प्रेम होते आणि आपले लग्न टिकवायचे होते, असेही चारूने सांगितले. ( Charu Asopa Divorce)
मुलीसाठी या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. राजीवने भविष्यात जुन्या समस्या पुन्हा निर्माण होणार नाहीत, असे आश्वासन दिल्यानंतर चारूने घटस्फोटाचा विचारही काही काळ बाजूला ठेवला होता. मात्र, हा समेट फार काळ टिकला नाही.
दरम्यान, राजीव सेनने चारूने केलेले आरोप फेटाळून लावले होते. उलट चारूचे अभिनेता करण मेहरासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप त्याने केला होता. चारूने हा दावा खोटा असल्याचे सांगून फेटाळला. राजीवने मात्र चारूच्या आईकडून कथित संबंधांबाबत व्हॉइस नोट्स मिळाल्याचा दावा केला होता. ( TV Actress)
घटस्फोटानंतरही मुलगी झियानाच्या भविष्यासाठी राजीवसोबत सलोख्याचे संबंध ठेवण्याची इच्छा चारूने व्यक्त केली. आपल्या मुलीला वडिलांसोबत वेळ घालवता यावा आणि आई-वडिलांना विषारी नात्यात पाहण्याची वेळ तिच्यावर येऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचे चारूने सांगितले. (Entertainment News)
चारू असोपा ‘मेरे अंगने में’, ‘देवों के देव...महादेव’, ‘जीजी माँ’, ‘बालवीर’ आणि ‘लाडो 2’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. (Marathi News)






