DJ Ban : १ नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

नागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा आणि आगामी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला असून गणेश मंडळे तयारीला लागली आहेत. सणासुदीच्या याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय समोर आला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी ३ सप्टेंबरच्या रात्रीपासून ते १ नोव्हेंबरपर्यंत शहरात डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टिम, डीजे वाहने, डिम लाईट्स आणि डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर लाईट्सच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. उत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता राखणे आणि ध्वनी तसेच प्रकाश प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे.



नागपूरमधील या निर्णयामुळे मिरवणुकांमध्ये डिजेच्या तालावर थिरकणाऱ्या गणेश भक्तांवर काहीसे निर्बंध आले असले, तरी दुसरीकडे पुणे शहरातही अशाच प्रकारच्या बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. पुण्यातील विद्यानंद बापट नावाच्या सामान्य नागरिकाने ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत महापालिकेच्या बैठकीत डीजे, डॉल्बी आणि ढोल-ताशांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अतिप्रमाण वाढणाऱ्या आवाजामुळे पुणेकरांना त्रास होत असून ढोल-ताशांसारखी वाद्ये कालबाह्य झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकीकडे नागपुरात प्रशासनाने कडक पावले उचलली असताना, पुण्यातील गणेश मंडळे या वाढत्या मागण्यांवर आणि नागपूरच्या निर्णयावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Beed Accident : तुळजापूरला चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात

बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी

Nashik Accident News: भीषण अपघात! भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक; पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष

FDA Raids: रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला FDA चा दणका, संचालकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट. प्रदान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंगी मेघे (वर्धा) येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड

शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपणाऱ्या संस्थाचालकांची ‘एसआयटी’ चौकशी करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

मुंबई : शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या आणि उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून