Nashik : नाशिकमध्ये डेंग्यूचा वाढता धोका, महिनाभरात १०१ रुग्णांची नोंद

Nashik : पावसाने काहीशी उघडीप घेतली असली, तरी नाशिक शहरात सध्या ऊन-पावसाचा खेळ नागरिकांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरत आहे. बदलते वातावरण, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि वाढलेला डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील महिनाभरात शहरात डेंग्यूचे (Dengue) तब्बल १०१ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय जानेवारी ते ऑगस्टअखेरपर्यंत मलेरियाचे १२, तर चिकनगुनियाचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. (Nashik News)



महिनाभरात १०१ रुग्णांची नोंद


ऑगस्ट महिन्यात नाशिक शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता शहरात ऊन पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाच्या काळात विविध ठिकाणी साचलेले पाणी आणि घरांच्या परिसरात जमा झालेले पाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरत आहे. विशेषतः घरांच्या आवारात पडून असलेल्या वस्तूंमध्ये, टायर, कुंड्या, डबे तसेच इतर ठिकाणी पाणी साचत असल्याने एडिस डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी डेंग्यूचा धोका वाढला आहे.


दुसरीकडे, बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. शहरातील अनेक नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि जुलाब यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहेत. त्यामुळे शहरातील विविध खासगी आणि शासकीय दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिकरोड, सिडको, पंचवटी आणि सातपूर या भागांमध्ये जानेवारी ते ऑगस्टअखेरपर्यंत मलेरियाचे (Malaria) १२ रुग्ण, चिकनगुनियाचे (Chikungunya) नऊ रुग्ण आणि डेंग्यूचे (Dengue) १०१ रुग्ण आढळून आले आहेत. (Nashik News)



आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण आणि फवारणी


डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील संशयित आणि बाधित भागांमध्ये फवारणी केली जात असून, पाणी साचलेल्या ठिकाणी अळीनाशक फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी मायकिंगही करण्यात येत आहे. मोठ्या पाणीसाठ्यांमध्ये डासांच्या अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहितीही आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.


घरांच्या परिसरात किंवा इतर ठिकाणी पाणी साचून त्यामध्ये एडिस डासाच्या अळ्या आढळून आल्यास संबंधितांना नोटिसा देण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार काही ठिकाणी दंडात्मक कारवाईही केली जात आहे. एडिस डासाच्या अळ्या आढळून आलेल्या ठिकाणी नोटिसा बजावण्यात येत असल्याची माहिती मलेरिया विभागाचे डॉ. रवींद्र ढोले यांनी दिली आहे. (Nashik News)



नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन


दरम्यान, डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनीही विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची सर्व भांडी पूर्णपणे रिकामी करावीत. पाण्याची भांडी झाकून ठेवावीत आणि घराच्या परिसरात कोणत्याही ठिकाणी पाणी साचू देऊ नये. ताप आल्यास स्वतःहून औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. दिवसा डास चावत असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डास प्रतिबंधक मलमाचा वापर करावा. तसेच शक्यतो पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत.


पावसानंतर आता ऊन-पावसाचे बदलते वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनासोबतच नागरिकांनीही आपल्या घराभोवती स्वच्छता ठेवणे आणि पाणी साचू न देणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला