Government Canteens : चहा-समोसा विसरा! सरकारी बैठका आणि उपहारगृहांमध्ये आता पौष्टिक मेन्यू

मुंबई : महाराष्ट्रातील शासकीय उपहारगृहे तसेच सरकारी बैठका आणि विविध कार्यक्रमांमध्ये आता आरोग्यदायी खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले जाणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात आदेश जारी केले असून, बाजरीची खिचडी, मोड आलेल्या धान्याची आमटी, सोलकढी, मोसमी फळे आणि इतर पौष्टिक पदार्थांचा मेन्यूमध्ये समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ( Government Meetings)

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिप्रक्रिया केलेले पदार्थ तसेच साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबीचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा पौष्टिक मेन्यू तयार करण्यात येणार आहे. ( Maharashtra Government)


बैठकांमध्ये मिळणार हेल्दी फुड


लहान बैठका आणि अल्पोपाहारासाठी मोसमी फळे, भाजलेले किंवा उकडलेले चणे व शेंगदाणे, मोड आलेले धान्य, व्हेजिटेबल पोहे, इडली-सांबार, व्हेजिटेबल उपमा, बाजरीची खिचडी, उकडलेली अंडी, सुकामेवा आणि बियांचा समावेश करण्यात येणार आहे. पेयांमध्ये नारळपाणी, ताक, सोलकढी, बिनसाखरेचे दूध, कमी साखर किंवा गूळ घातलेले लिंबूपाणी तसेच ग्रीन टी आणि हर्बल टीचा समावेश असेल.

अर्धदिवसीय आणि पूर्णदिवसीय कार्यक्रमांमध्ये ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी, मल्टीग्रेन चपाती, ब्राऊन राईस, डाळ-उसळ, कमी तेलातील भाज्या, सॅलड, दही, ताक आणि फळे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ( Nutritious Menu)

या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व सरकारी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, प्रशिक्षण संस्था आणि शासकीय उपहारगृहांमध्ये करण्यात येणार आहे. उपहारगृहांच्या मेन्यूवर देखरेख ठेवण्यासाठी समिती आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकारासारख्या असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी करणे हा आहे. ( Healthy Food)
Comments
Add Comment

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.