मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) रंगात रंगण्यासाठी सज्ज झाला आहे. याच भक्तिमय वातावरणात टाइम्स म्युझिक स्पिरिच्युअलने रसिकांसाठी खास सुरेल भेट आणली आहे. गायिका राधिका भिडेच्या मधाळ आवाजातील ‘विश्वाचा गणराज तू’ हे नवं मराठी भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं असून, रिलीज होताच या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Radhika Bhide)
भक्ती आणि उत्सवाचा सुरेल संगम
‘विश्वाचा गणराज तू’ हे गीत गणेशोत्सवाचा उत्साह आणि बाप्पाप्रती असलेला भक्तिभाव यांचा सुंदर संगम आहे. राधिका भिडेच्या भावपूर्ण आवाजामुळे गाण्याला खास भक्तिमय रंग मिळाला आहे. संगीतकार मयूर बाहुलकर यांनी गाण्याला सुरेल चाल दिली असून, समृद्धी पांडे यांच्या अर्थपूर्ण शब्दांनी गीताची आध्यात्मिक उंची वाढवली आहे. (Radhika Bhide)
मुंबई : बॉलिवूडमध्ये काही असे तारे आहेत, ज्यांची ओळख फक्त त्यांच्या हिट चित्रपटांमुळे नाही, तर त्यांच्या दीर्घ कारकिर्दीमुळे आणि दमदार स्क्रीन ...
या नव्या गाण्याबद्दल बोलताना राधिका भिडे म्हणाली, “गणपती बाप्पासाठी गाणं म्हणणं ही माझ्या हृदयाच्या जवळची गोष्ट आहे. बाप्पाच्या आगमनासोबत निर्माण होणारे चैतन्य माझ्या आवाजातून श्रोत्यांपर्यंत पोहोचावे, हा प्रामाणिक प्रयत्न होता. ‘विश्वाचा गणराज तू’ हे गाणं जल्लोष आणि भक्तिभावाने सजलं आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणं घरोघरी आणि गणेश मंडपांमध्ये नक्कीच पोहोचेल, अशी मला आशा आहे.” (Radhika Bhide)