Swine Flu : पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता धोका; ऑगस्टमध्ये 31 रुग्ण, पालिकेचा सावधगिरीचा इशारा

पिंपरी-चिंचवड : ऐन सणासुदीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून ऑगस्ट महिन्यात तब्बल 31 रुग्ण आढळले आहेत. मात्र, सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ( Swine Flu)


शहरात यावर्षी जानेवारी महिन्यात स्वाईन फ्लूचा 1 रुग्ण आढळला होता. त्यानंतर जुलैमध्ये 5 रुग्णांची नोंद झाली. मात्र ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊन 31 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे.



गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 2022 मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे 58 रुग्ण आढळले होते. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात 34 रुग्णांची नोंद झाली होती. तर 2024 मध्ये शहरात 15 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. ( PCMC)


दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, मास्कचा वापर करावा आणि वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असा सल्ला महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. ( Swine Flu in Pimpri Chinchwad)



स्वाईन फ्लू म्हणजे काय?


स्वाईन फ्लूला H1N1 फ्लू असेही म्हटले जाते. हा इन्फ्लूएन्झा विषाणूमुळे होणारा श्वसनाचा संसर्ग आहे. संक्रमित व्यक्तीच्या खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या थेंबांमधून याचा प्रसार होऊ शकतो. तसेच संक्रमित व्यक्ती किंवा दूषित वस्तूंना स्पर्श केल्यानंतर नाक, तोंड किंवा डोळ्यांना हात लावल्यासही संसर्ग होण्याची शक्यता असते.(Symptoms of Swine Flu)



स्वाईन फ्लूची प्रमुख लक्षणे



  • सर्दी आणि ताप

  • घसा खवखवणे

  • सतत खोकला

  • नाक वाहणे

  • डोकेदुखी

  • डोळ्यात पाणी येणे

  • अतिशय थकवा जाणवणे

  • काही रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास किंवा न्यूमोनिया


ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड, यकृत किंवा श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.


H1N1 ची लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षणे जास्त असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.







Comments
Add Comment

Nashik Accident News: भीषण अपघात! भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक; पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष

FDA Raids: रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला FDA चा दणका, संचालकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट. प्रदान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंगी मेघे (वर्धा) येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड

शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपणाऱ्या संस्थाचालकांची ‘एसआयटी’ चौकशी करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

मुंबई : शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या आणि उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी