BCCI Clarification : रोहित शर्माच्या टीम इंडियातील स्थानाला धोका नाही; बीसीसीआय सचिवांकडून अफवांना पूर्णविराम

मुंबई : भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माला वनडे संघात स्थान देण्याबाबत काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित 2027 च्या विश्वचषकात खेळताना चाहत्यांना पाहता येणार नाही. मात्र, आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.



रोहित शर्माच्या बाबतीत सद्यस्थिती कायम आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पष्ट केले आहे की, या माजी कर्णधाराच्या टीम इंडियातील स्थानाला कोणताही तात्काळ धोका नाही. विशेषतः २०२७ च्या विश्वचषकातील सहभागाबाबत मोठ्या प्रमाणावर तर्कवितर्क लावले जात आहेत. बैठकीनंतर रोहित शर्माच्या भविष्याबद्दल माहिती देताना बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, "रोहित शर्मा प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट खेळत आहे. यापेक्षा अधिक काय हवे? रोहितने मागच्या सामन्यात १३८ धावा देखील केल्या होत्या. मग अशा अफवा का पसरवल्या जात आहेत?."


या बैठकीला भारताचे दोन कर्णधार म्हणजेच शुभमन गिल (कसोटी आणि एकदिवसीय सामने) आणि श्रेयस अय्यर (टी-२० सामने) उपस्थित होते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे (सीओई) प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे देखील यावेळी उपस्थित होते. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. ते मुंबईबाहेर होते त्यामुळे ते या बैठकीला हजर राहू शकले नाहीत.



बीसीसीआयच्या सचिवांनी लक्ष्मण यांचा 'क्रिकेट संचालक' अशा नवीन भूमिकेसाठी विचार केला जात असल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. तसेच, आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये कोणताही तात्काळ बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

VVS Laxman : व्हीव्हीएस लक्ष्मण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे (सीओई) क्रिकेट संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण हे जपानमधील आइची-नागोया

Asian Games 2026 : आशियाई खेळांसाठी दुखापतग्रस्त नीरज चोप्राच्या जागी यशवीर सिंगला संधी

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू यशवीर सिंगचा, दुखापतग्रस्त नीरज

China Masters : किदाम्बी श्रीकांतची आगेकूच कायम, तन्वी शर्माचे आव्हान संपुष्टात

शेन्झेन (चीन) : किदाम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर लाईला पराभूत करत चायना

ICC Women's Champions Trophy 2027 : पहिली आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले की, पहिली आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ ही

India Asian Games 2026 Squad : क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई खेळांसाठी ५०३ खेळाडू आणि २४६ सहाय्यक कर्मचाऱ्यांना मंजुरी

नवी दिल्ली : आशियाई खेळांसाठी ५०३ भारतीय खेळाडू, २४६ संघ अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे पथक जपानला जाणार आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका; जॉन्टी ऱ्होड्सचा बीसीसीआयला मोलाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या भविष्याबाबत आ