Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; सहभागासाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत

मुंबई : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केला आहे. २०२६ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील तसेच परदेशातील सामाजिक व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.


या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. इच्छुक मंडळांनी विहित नमुन्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.



यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होत असून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून मंडळांच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन विविध निकषांच्या आधारे अभिप्रायासह गुणांकन करण्यात येणार आहे.


जिल्हास्तरीय समिती उत्कृष्ट तीन गणेशोत्सव मंडळांची शिफारस करणार असून, संबंधित मंडळांची नावे, आवश्यक कागदपत्रे, व्हिडीओ व अभिप्राय यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय समितीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.



स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची तारीख तसेच विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पुरस्कार वितरण समारंभाबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असेही मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कळविले आहे.


Comments
Add Comment

Dhamma Chakra Pravartan Din 2026 : मध्य रेल्वेची जय्यत तयारी; नागपूर व अजनी स्थानकांवर अडीच लाख प्रवाशांच्या आगमनाची अपेक्षा

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरला भेट देणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान, 182 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

मुंबई: सध्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदानाची जोरदार चर्चा सुरू आहे. या

Shiv Sena Dasara Melava 2026: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करणार?

मुंबई: राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त

Thane Coastal Road: ठाणे कोस्टल रोडच्या कामाला वेग! एकाच दिवसात 10 गर्डर उभारले; प्रकल्पाचे 45 टक्के काम पूर्ण

ठाणे: मुंबई प्रमाणेच, ठाणे शहरातही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न

Nagpur Metro News: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोचा तिसरा टप्पा 55 किमीचा; 10 किमी मार्ग भूमिगत असण्याची शक्यता

नागपूर: नागपूर मेट्रोच्या विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मेट्रोचा पहिला टप्पा सुरू असून दुसऱ्या

Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगात; रामकुंड येथे 51 आणि 31 फुटांचे धर्मध्वज उभारले

Nashik News: नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या