विश्वास, रणनीती आणि विश्वासाघाताने भरलेला 'द ट्रेटर्स' (The Traitors) या लोकप्रिय रिएलिटी शोचा दुसरा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सलग १० भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवल्यानंतर आज या शोच्या विजेत्याची अधिकृत घोषणा होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) या शोचे सूत्रसंचालन करत असून, अंतिम फेरीत क्रिस्टल डिसूझा (Krystle D'Souza) आणि रिदा थराणा (Rida Tharana) या दोन 'ट्रेटर्स' (गद्दार) खेळाडू शिल्लक राहिल्या आहेत. त्या उर्वरित 'इनोसंट्स' (निष्पाप) खेळाडूंना चकवून विजेतेपदावर कब्जा मिळवतात का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
कुठे अन् कधी पाहाता येणार फायनल ?
'द ट्रेटर्स' सीझन २ (The Traitors Season 2) चा हा बहुप्रतिक्षित महाअंतिम भाग ३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता 'ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ' (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जात आहे.
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत एकाच दिवसात तीन मोठे गुन्हे उघडकीस आणले ...
अंतिम फेरीत पोहोचलेले ६ शिलेदार
सध्या शोच्या विजेतेपदाच्या शर्यतीत मल्लिका शेरावत, साहिल सलाथिया, शालिनी पासी, रिदा थराणा, दलीप ताहिल आणि क्रिस्टल डिसूझा हे ६ स्पर्धक उरले आहेत. विशेष म्हणजे, क्रिस्टल ही पहिल्या दिवसापासून 'ट्रेटर' म्हणून खेळत असून तिने कुल्लू, शहनील गिल आणि हरमन सिंघा यांसारख्या इतर सहकाऱ्यांनाही मागे टाकले आहे. खेळ पुढे नेण्यासाठी क्रिस्टलने सातव्या भागात रिदा थराणाला आपल्या गटात सामील करून घेतले होते.
करण जोहरकडून क्रिस्टलच्या गेमची प्रशंसा:
शोचा सूत्रसंचालक करण जोहरने क्रिस्टलच्या खेळीचे मनापासून कौतुक केले आहे. तिच्या शांत पण अचूक रणनीतीबद्दल बोलताना करण म्हणाला, "तू अत्यंत हुशारीने आणि समंजसपणाने हा खेळ खेळला आहेस." क्रिस्टलने सुरुवातीपासूनच स्वतःला जास्त चर्चेत न ठेवता इतर स्पर्धकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला आणि मोक्याच्या वेळी योग्य निर्णय घेतले, ज्यामुळे ती फायनलपर्यंत पोहोचू शकली.
मल्लिका शेरावत आणि शहनील गिलमधील रंजक संवाद:
शोच्या दरम्यान घडलेल्या एका रंजक प्रसंगाची आठवण सांगताना मल्लिका शेरावत म्हणाली होती, "मी शहनीलला गमतीने विचारले होते की, जर तू ट्रेटर निघालीस तर माझे मन दुखावेल, कारण मी तुला लहान बहिणीसारखे मानते." यावर उत्तर देताना शहनीलने आपण ट्रेटर नसल्याचे सांगत रिया चक्रवर्तीचा संदर्भ दिला होता. रियाबद्दल बोलताना शहनील म्हणाली होती की, संपूर्ण जग रियाला वेगळ्या नजरेने पाहत असल्याने ती स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी या शोमध्ये आली आहे.
सुरुवातीलाच बसला होता मोठा धक्का:
या सीझनच्या पहिल्याच 'सर्कल ऑफ शक' (Circle of Shaq) मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला होता. सुप्रसिद्ध कॉमेडियन मुनावर फारुकी याने मल्लिका शेरावतवर ट्रेटर असल्याचा उघडपणे संशय व्यक्त केला होता. परंतु, त्याचा हाच संशय त्याच्यावर उलटला आणि इतर स्पर्धकांनी बहुमताने मत देऊन मुनावरलाच पहिल्याच टप्प्यात शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता.