नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू यशवीर सिंगचा, दुखापतग्रस्त नीरज चोप्राच्या जागी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठीच्या भारतीय ॲथलेटिक्स संघात समावेश करण्यात आला आहे. लांब पल्ल्याचा धावपटू अभिषेक पाल याला कथित उत्तेजक द्रव्य सेवनाच्या उल्लंघनाबद्दल नाडा (NADA) कडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर संघातून वगळण्यात आले आहे. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (AFI) लुधियाना येथे एका पत्रकार परिषदेत, १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ऐची-नागोया आशियाई खेळांसाठी ७७ सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा केली. राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप स्पर्धा देखील लुधियाना येथे आयोजित करण्यात येत आहेत.
विश्वास, रणनीती आणि विश्वासाघाताने भरलेला 'द ट्रेटर्स' (The Traitors) या लोकप्रिय रिएलिटी शोचा दुसरा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सलग १० भाग ...
यशवीर सिंगने नुकत्याच झालेल्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) ८५.४१ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत कांस्य पदक जिंकले होते. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो नीरज चोप्रासाठी सर्वोत्तम पर्याय ठरला.
पुरुषांची भालाफेक टीम
जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई खेळांमध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात यशवीर सिंग आणि रोहित यादव हे दोन खेळाडू भारताचे आव्हान सादर करतील. नीरज चोप्राचा इतिहास
नीरज चोप्राने २०१८ (जकार्ता) आणि २०२३ (हांगझोऊ) आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यंदा दुखापतीमुळे त्याला आपले जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरता येणार नाही.






