नवी दिल्ली : देशातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त बिघडवणाऱ्या वाहनचालकांवर कठोर चाप बसवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वाहतूक व्यवस्थेत एक नवीन 'ग्रेडेड पॉइंट सिस्टीम' (Graded Point System) लागू करण्याचे संकेत दिले आहेत. या नवीन नियमानुसार, नियम मोडणाऱ्या चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स थेट रद्द किंवा निलंबित (Suspend) केले जाऊ शकते.
काय आहे प्रस्तावित 'पॉइंट सिस्टीम' ?
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो स्थानकाच्या (Goregoan Metro Station) अगदी खाली उभ्या ...
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या ६६ व्या वार्षिक परिषदेत बोलताना नितीन गडकरी यांनी या योजनेची माहिती दिली. या नव्या प्रस्तावित प्रणालीअंतर्गत, प्रत्येक वाहनचालकाचे उल्लंघन थेट त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सशी (DL) जोडले जाईल. जेव्हा जेव्हा एखादा चालक वाहतुकीचा नियम मोडेल, तेव्हा त्याच्या लायसन्स अकाउंटमधून ठराविक पॉइंट्स वजा केले जातील. पेनल्टीचे हे पॉइंट्स एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वजा झाल्यास, संबंधित चालकाचे लायसन्स निलंबित करणे किंवा ते कायमस्वरूपी रद्द करण्याचा पूर्ण अधिकार वाहतूक विभागाला असेल.
उत्कृष्ट चालकांना मिळणार प्रोत्साहन आणि सवलती
ही यंत्रणा केवळ दंडात्मक कारवाईपुरती मर्यादित नसून, नियमांचे तंतोतंत पालन करणाऱ्या जबाबदार वाहनचालकांचा यात बहुमान केला जाणार आहे. ज्या चालकांचा ड्रायव्हिंग रेकॉर्ड पूर्णपणे स्वच्छ असेल, त्यांना विविध प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातील. यामध्ये वाहनांचा विमा काढताना किंवा रिन्यू करताना विमा कंपन्यांकडून विशेष प्रीमियम डिस्काउंट किंवा सवलती मिळण्याची शक्यता आहे.
चालकांच्या बेजबाबदार वर्तनाला बसणार चाप
रस्ते सुरक्षेतील सर्वात मोठे आव्हान हे चालकांचे बेजबाबदार वर्तन असल्याचे सांगत गडकरी यांनी स्पष्ट केले की, आता केवळ एकदा ई-चालन फाडून भागणार नाही. ओव्हरस्पीडिंग, सिग्नल जंप करणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे यांसारख्या धोकादायक कृत्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. चालकांनी वेळेत आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही, तर या प्रणालीद्वारे त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, ज्यामुळे रस्त्यावरील अपघात रोखण्यास मोठी मदत होईल.