BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची प्रभावी तयारी करता यावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत एकरकमी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.


या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. तसेच, अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘बार्टी’, पुणे कार्यालयाकडे पोस्ट अथवा कुरियरद्वारे पाठविणे बंधनकारक आहे.



या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक असून, २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी उमेदवाराची वयोमर्यादा कमाल ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.


अर्जासोबत जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, ओळख पुरावा तसेच उमेदवाराच्या स्वतःच्या नावे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची प्रत जोडणे आवश्यक आहे. केवळ ऑनलाईन अथवा केवळ ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८/२८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – ४११००१ या पत्त्यावर पाठवावी. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी ०२०-२६३३३३३० अथवा ०२०-२६३३३३३९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Fire News : साकीनाका परिसरात भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Mumbai Fire News: अंधेरी येथील साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे मंगळवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन

Mumbai : पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांसह 4 जणांना अटक; शस्त्र मुंबईत आणल्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या कथित गोळीबार प्रकरणाच्या तपासात दिल्ली

Mumbai Viewing Gallery : मुंबईत समुद्र किनारी तिसरी व्ह्युईंग गॅलरी बनणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांसह पर्यटकांना समुद्राचे विलोभनीय

WEH Toilet Project : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बनवणार तीन आकांक्षी शौचालय

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्यावतीने आता आकांक्षी शौचालय शहरापाठोपाठ पश्चिम उपनगरांत बांधले जाणार आहे.

BMC Waste Management : मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्रांच्या प्रकल्पांना आता प्रतिसाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबईतील राडारोडा वाहतूक आणि विल्हेवाटीच्या महापालिकेच्या प्रकल्पाला आता