swami vivekanand vidyamandir news : स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात लिओ क्लबची स्थापना! विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना मिळणार वाव

वाडा : वार्ताहर 


विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वाडा येथे लिओ क्लब ऑफ विवेकानंद वाडाची स्थापना करण्यात आली. लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३२३१-ए२ (झेड-४) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्थापना व पदग्रहण समारंभात नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.




या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिओ लायन इशिका शाह, लिओ डिस्ट्रिक्ट ऍडव्हायझर अक्षय लडगे, तसेच विशेष अतिथी म्हणून लिओ ध्रुवी वरचंद (GAT Director),   उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीत सिद्धांत विभव पाटील यांची अध्यक्षपदी, कामिनी संतोष नलावडे यांची उपाध्यक्षपदी, वेदिका विलास धिडा यांची सचिवपदी तर हिमांशू दिनेश निशाद यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.


यावेळी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्वगुण विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले. नव्याने स्थापन झालेल्या लिओ क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. स्थापना व पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Comments
Add Comment

France Protest : आंदोलनाच्या आगीत ऐतिहासिक वास्तू भस्मसात; फ्रेंच नागरिकांमधून तीव्र संताप आणि दुःख

 France Protest :  फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि लुटमार सुरू आहे. पॅरिससह दहा शहरांमध्ये हिंसाचार

Nashik : त्र्यंबकेश्वर येथे अति महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी अति महत्वाच्या व्यक्ती येणार आहेत.

SBI Cyber Attack : ग्राहकांनो सावध राहा! SBI च्या सिस्टीमवर सायबर हल्ला; हजारो खातेदारांची माहिती लीक झाल्याचा दावा

SBI Cyber Attack: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर सायबर हल्ला झाल्याचा आणि ग्राहकांची वैयक्तिक माहिती उघड झाल्याचा दावा करण्यात

Nashik : कुशावर्त परिसरातील ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला अधिक गती द्यावी, आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून पूर्वतयारीची पाहणी

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसरात सुरू

Nashik : दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिककरांची घरखरेदीला पसंती ! रिअल इस्टेटमध्ये १२५ कोटींहून अधिक उलाढाल

Nashik : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांनी गृहखरेदीचा मुहूर्त साधत रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बूस्ट दिला.

कर वाचवण्यासाठी परराज्यात वाहन नोंदणी? महाराष्ट्रात ४७५ वाहनांवर कारवाई!

राज्यात वापरली जाणारी परंतु कर चुकवण्यासाठी महाराष्ट्राबाहेर नोंदणी केलेली वाहने उघडकीस आणण्याच्या