बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पिशिन जिल्ह्यातील झियारत क्रॉस परिसरात ३ सप्टेंबर रोजी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी बंदी घातलेल्या बलुच लिबरेशन आर्मीने म्हणजेच बीएलए ने स्वीकारली आहे.
बीएलए च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांच्या ताफ्यातील चार वाहनांना लक्ष्य करण्यात आले. त्यापैकी दोन वाहने उद्ध्वस्त झाली असून, या हल्ल्यात १८ पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. हल्ल्यानंतर काही शस्त्रे ताब्यात घेतल्याचाही बीएलएचा दावा आहे. या कारवाईत संघटनेच्या Fateh Squadचा सहभाग असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, १८ जवानांच्या मृत्यूच्या दाव्याची पाकिस्तान सरकार किंवा लष्कराकडून अद्याप स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
दुबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने आणखी एक विक्रम रचला आहे. तिने भारताची माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकत महिला आंतरराष्ट्रीय ...
याच घटनेबाबत काही पाकिस्तानी वृत्तांमध्ये वेगळी माहिती समोर आली आहे. पाकिस्तान ऑब्झर्व्हरच्या वृत्तानुसार, झियारत क्रॉस येथे Assistant Commissioner of Harnai यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ८ सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्युत्तराच्या कारवाईत ११ दहशतवादी मारले गेल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, झियारत क्रॉस परिसरात यापूर्वीही सुरक्षा दलांवर हल्ले झाले आहेत. ३१ ऑगस्टच्या रात्री आणि १ सप्टेंबरच्या पहाटे Customs Houseवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सहा सुरक्षा कर्मचारी आणि एका Customs अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.