Ritu Tawde : महापालिकेसह खासगी शाळांमधील ५० आदर्श शिक्षकांना महापौर पुरस्कार; महापौर रितू तावडे यांनी पुरस्कार विजेत्यांची नावे केली जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुंबई महापालिका शाळांमधील आणि खासगी शाळांमधील ५० मुख्याध्यापक, शिक्षक, साहाय्यक शिक्षकांची "आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार"साठी निवड करण्यात आली आहे. या सर्व आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार विजेत्यांची नावे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत घोषित केले.


मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षण विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श महापौर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन १९७१ पासून हा या पुरस्काराने ५० शिक्षकांना गौरविण्यात येते. या पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली. याप्रसंगी शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे तसेच शिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे आदी उपस्थित होते. या पुरस्काराबाबात प्रास्तावित करताना शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी या पुरस्कारासाठी १२१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातुन ५० शिक्षकांची अंतिम निवड करण्यात आली आहे.



शिक्षण विभागातील महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत, त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन १९७१ पासून सुरू आहे. या परंपरेत आता दरवर्षी ५० आदर्श शिक्षकांना ‘महापौर पुरस्काराने’ गौरविण्यात येते.


विशेष बाब म्हणजे या ५० पुरस्कार विजेत्यांमध्ये, पुरुष शिक्षकांना मागे ठेवत सर्वाधिक ३२ महिलांनी बाजी मारली आहे. तसेच,या ५० पुरस्कार विजेत्यांमध्ये मराठी माध्यमांच्या - २० शिक्षकांचा, १० हिंदी माध्यमांच्या, १० इंग्रजी माध्यमाच्या, ८ उर्दू माध्यमांच्या, १ गुजराती आणि १ कन्नड माध्यमाच्या शिक्षक, मुख्याध्यापकांचा समावेश आहे.


मुंबई महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११ हजार (ईसीएस द्वारे), मुंबई महापालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करुन सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार वितरणाची तारीख यानंतर जाहीर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.


आगामी काळात महापौर पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शिक्षकांचा सहभाग वाढविणे, पुरस्काराची रक्कम वाढविणे आणि पुरस्कार विजेत्या शिक्षकांची संख्या ५० पेक्षा जास्त वाढविण्याबाबत महापौरांच्या मदतीने प्रयत्न केला जाईल,असेही शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी सांगितले



५० पुरस्कारांमध्ये सर्वाधिक मराठी भाषिक ३२ शिक्षक


महापालिका, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये विविध माध्यमांतून शिक्षण देणारे शिक्षक हे मराठी भाषिक आहेत. त्यामुळे, मूळ मराठी माध्यमांचे २० शिक्षक आणि इतर माध्यमातून शिकविणारे १२ मराठी भाषिक शिक्षक यांची संख्या पाहता एकूण ५० पुरस्कारांमध्ये सर्वाधिक मराठी भाषिक ३२ शिक्षक आहेत.



पुरस्कार विजेत्या शिक्षकांची नावे


दिलीमा कदम, निर्मला कुऱ्हे, जयश्री कांबळे, विद्या पाटील, वृषाली गोसावी, विना जटार, वसंत शिंदे, रश्मी पाटील, रसिका गोसावी, कल्पना कांबळे, ज्योती वारघडे, मोहन सिंह, शंकर भालेराव, अनंता आठवले, सोनिया राव, राजपती प्रजापती, अमिदा पटेल, होनपुरे वसीम, मुसा अन्सारी, जमीरा बानो, मोहम्मद उमर शहा, शमीम तौसिफ अहमद, रोहिणी म्हेत्रे, प्राजक्ता सुर्वे, प्राची ठाकूर, बाळासाहेब कणके, मुंजा गिरी, माधवी सावंत, विना प्रजापती, सविता सिंदगी, वैशाली टंकसाळी, सुरेश वाघमारे, राजश्री बोहरा, स्मिता घाडीगावकर, स्वाती चौधरी, गणेश सलवदे, प्राजक्ता बिरारी, जटाशंकर गुप्ता, सचिन लोखंडे, नेहा डोईफोडे, उज्वला तांबे, रंजना भोर, पूर्वा सकपाळ, विनोद यादव, दीपक कदम, संध्या भोसले, सबा रिजवी, सायली राणे, पूजा मिश्रा, मंगल घाडगे

Comments
Add Comment

BMC Corporators Tablet : नगरसेवकांच्या हाती टॅब पडण्यापूर्वी खरेदीची फाईल बंद; ऍपलच्या टॅबवरील खर्चाचा आकडा पाहून प्रशासनाने घेतला आखडता हात?

मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने नगरसेवकांना टॅब

Heartwarming display of friendship : महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यात मैत्रीचा गोडवा; एकमेकांना भरवली जिलेबी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून मुंबईतील महापालिकेतील भाजपच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण करून

BMC News : बांधकामाचा अनधिकृत राडोराडा प्रकरणांत पाच महिन्यांत ३१.६४लाखांचा दंड वसूल; स्वच्छतेच्या नवीन उपविधीनुसार ५२५६ लोकांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या अनधिकृत विल्हेवाटीमुळे रस्त्यांवरील धूळ,

Mumbai Plastic Ban : मुंबईत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर पुन्हा कारवाई जोरात; फेरीवाले आणि मोठ्या गोदामांवर धडक कारवाई करण्याचे विधी समिती अध्यक्षांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असून, त्यामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा

Devendra Fadnavis : पुढील १० वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दीष्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : मुंबईच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.पुढील दहा वर्षांत मुंबई

IAS Transfers : सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर, रवींद्र खेबुडकरांची पुण्यात बदली; राज्य शासनाकडून ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.