Agripada Crime News : मुंबई हादरली! अग्रिपाड्यात पत्नीची हत्या करून पतीनेही उचललं टोकाचं पाऊल

मुंबई : मुंबईच्या अग्रिपाडा परिसरात पतीने पत्नीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. (Agripada Crime News)


मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद एहसान शेख (१९) याने पत्नी जन्नत एहसान शेख हिच्यावर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरवून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजता कालापानी चौकीजवळ ही घटना घडली. (Agripada Crime News)



घटनेत गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद एहसानला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जन्नत हिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. मोहम्मद एहसान आणि जन्नत हे दोघेही रोजंदारीवर काम करत होते. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Agripada Crime News)


प्राथमिक तपासात घरगुती वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या हत्याकांडामागे नेमके काय कारण होते, याचा तपास सध्या अग्रिपाडा पोलिसांकडून सुरू आहे. (Agripada Crime News)

Comments
Add Comment

Russia Ukraine War : पुतिन जिंकले, ट्रम्प हरले? रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिकेचा सर्वात मोठा युटर्न

वॉशिंग्टन: चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

सुवर्णमंदिरात सारा अली खान भावुक; आयुष्मान खुरानासमोरच अश्रू अनावर, VIDEO व्हायरल!

नुकतेच अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी त्यांच्या आगामी 'उडता तीर' चित्रपटाच्या

पोलीस स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिवादन; 154 वीर पोलिसांना श्रद्धांजली

ठाणे : देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस अधिकारी व जवानांच्या अतुलनीय शौर्याला

Manmad Junction : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-शिर्डी वंदे भारतला मनमाडमध्ये अधिकृत थांबा

Railway News: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला मनमाड

Nashik : ओझर-पिंपळगाव महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, अनेक प्रवासी जखमी

Nashik : ओझर-पिंपळगाव महामार्गावरील पुलावर आज दुपारी शिरपूर-नाशिक एसटी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या

HDFC बँकेत खळबळ! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती लीक?

बाजारमूल्यानुसार भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी (HDFC)बँकेच्या अंतर्गत चौकशीत, दोन वरिष्ठ