Adivasi Vikas Vibhag : शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षण आयुक्तालयाकडून १ हजार ६०० उमेदवारांची यादी प्राप्त; आदिवासी विकास विभागाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

मुंबई : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदांच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून, पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.


आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील एकूण २ हजार ४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीविना निवडीसाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील एकूण १ हजार ६०० उमेदवारांची यादी आदिवासी विकास विभागास प्राप्त झाली आहे.



यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गातील ९२७, माध्यमिक शिक्षक संवर्गातील ४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील २५२ उमेदवारांचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या उमेदवारांपैकी पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार १४१ उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसह अन्य आवश्यक मूळ कागदपत्रांची पडताळणी निर्धारित केंद्रांवर करण्यात येत आहे. विभागनिहाय पात्र उमेदवारांच्या संख्येमध्ये नाशिक विभागात सर्वाधिक ५८८ उमेदवारांचा समावेश असून, त्याखालोखाल ठाणे विभागात ४२४ उमेदवार, नागपूर विभागात २९६ उमेदवार तसेच अमरावती विभागात २९२ उमेदवार आहेत.


पडताळणी प्रक्रियेसाठी संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (स्वयंप्रमाणित) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांना निश्चित करून देण्यात आलेल्या दिनांक, वेळ व ठिकाणी उपस्थित राहावे. निर्धारित वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



पेसा क्षेत्रातील शिक्षक पदांसाठी प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या १९६, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या १६, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ९४, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या २ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या १५१ पदांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नॉन-पेसा क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ५९३, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या १२२, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ३०२, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या २३ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या १०१ पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.


शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली असून, या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी निर्धारित ठिकाणी, दिनांक व वेळेनुसार उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी.

Comments
Add Comment

Mumbai Fire News : साकीनाका परिसरात भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Mumbai Fire News: अंधेरी येथील साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे मंगळवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन

Mumbai : पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांसह 4 जणांना अटक; शस्त्र मुंबईत आणल्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या कथित गोळीबार प्रकरणाच्या तपासात दिल्ली

Mumbai Viewing Gallery : मुंबईत समुद्र किनारी तिसरी व्ह्युईंग गॅलरी बनणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांसह पर्यटकांना समुद्राचे विलोभनीय

WEH Toilet Project : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बनवणार तीन आकांक्षी शौचालय

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्यावतीने आता आकांक्षी शौचालय शहरापाठोपाठ पश्चिम उपनगरांत बांधले जाणार आहे.

BMC Waste Management : मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्रांच्या प्रकल्पांना आता प्रतिसाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबईतील राडारोडा वाहतूक आणि विल्हेवाटीच्या महापालिकेच्या प्रकल्पाला आता