PM modi congratulates Meloni : "माझ्या मैत्रिणीचे अभिनंदन!" इटलीत मेलोनींचा '८० वर्षांचा' ऐतिहासिक विक्रम; मोदींकडून खास शुभेच्छा!

नवी दिल्ली : इटलीच्या राजकीय इतिहासात पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Gorgia Meloni) यांनी एक सुवर्णपान लिहिलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा अभूतपूर्व विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सत्तेत १,४१३ दिवस पूर्ण केले. या ऐतिहासिक यशानंतर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी विशेष शब्दांत त्यांचे अभिनंदन केले आहे.





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक भावूक आणि आदरयुक्त पोस्ट शेअर केली. मेलोनी यांचा ‘माझी मैत्रीण’ असा सार्थ उल्लेख करत मोदींनी लिहिले की, "युद्धोत्तर इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणे, हा इटलीच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर असलेला दृढ विश्वास दर्शवतो." भारत आणि इटली यांच्यातील वाढत्या मैत्रीचा पुनरुच्चार करत त्यांनी पुढे म्हटले की, या धोरणात्मक भागीदारीमुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या समृद्धीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करण्याची आमची कटिबद्धता अधिक मजबूत झाली आहे.



मेलोनी यांनी हा टप्पा गाठताना इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचा जुना विक्रम मोडीत काढला. बर्लुस्कोनी यांचे सरकार २००१ ते २००५ दरम्यान १,४१२ दिवस सत्तेवर होते. इटलीचा राजकीय इतिहास हा प्रामुख्याने राजकीय अस्थिरतेसाठी ओळखला जातो; गेल्या ८० वर्षांत देशाने तब्बल ६८ सरकारे पाहिली आहेत, जिथे एका मंत्रिमंडळाचा सरासरी कार्यकाळ अवघा १४ महिन्यांचा राहिला आहे. अशा पार्श्वभूमीवर मेलोनी यांनी १,४१३ दिवसांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणे, ही इटलीतील राजकीय स्थैर्याची अत्यंत महत्त्वपूर्ण नांदी मानली जात आहे.


नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील सौहार्दाच्या संबंधांमुळे भारत-इटली द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांदरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि व्यापाराच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. राजकीय वर्तुळात या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा असते. यापूर्वी जून २०२६ मध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतातील दीर्घकालीन पंतप्रधानपदाचा टप्पा पार केला होता, तेव्हा मेलोनी यांनीही त्यांचे असेच मनापासून अभिनंदन केले होते. आता मेलोनी यांच्या या विक्रमावर मोदींनी दिलेल्या शुभेच्छांमुळे दोन्ही देशांतील राजनैतिक बंध अधिक दृढ झाले आहेत.


Comments
Add Comment

Mumbai Valsad passenger gambling video : मुंबई-वलसाड पॅसेंजर ट्रेनमध्ये जुगाराचा खेळ अन् सीटवर चक्क... व्हायरल व्हिडिओने खळबळ!

मुंबई : मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते वलसाड (Walsad) दरम्यान जाणाऱ्या ५९०२३ जलद पॅसेंजर ट्रेनमध्ये काही प्रवाशांकडून चक्क

BCCI Action 62 Players : BCCI ची धडक कारवाई; रोहितसह ६२ खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी, अंडर-१९ वर्ल्ड कप विजेत्याचाही समावेश

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वयाची खोटी कागदपत्रे आणि चुकीच्या नोंदी सादर

Indian Army : भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद, नदीत वाहून गेले

नवी दिल्ली : हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील हथनीकुंड बॅरेज येथे सराव सुरू असताना एक अपघात झाला. या अपघातामुळे

google gemini 3 8 flash : गूगलचा सर्वात मोठा धमाका! 'Gemini 3.8 Flash' लाँच; कोडिंग स्पीड पाहून जग चक्रावले

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील तीव्र स्पर्धेत गूगलने आपले स्थान पुन्हा भक्कम केले आहे. OpenAI आणि

IndiGo flight accident : नवी मुंबईहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे विमान विमानतळावर पार्किंग करताना खांबाला धडकले; सर्व प्रवासी सुरक्षित

Srinagar : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठा अपघात टळला. नवी मुंबईहून

Weather update : एल निनोचे सावट! भारतात थंडी गायब होणार; पुढील सहा महिन्यांसाठी हवामान विभागाचा 'रेड अलर्ट', शेतीवरही मोठे संकट

हवामानातील सततच्या बदलांमुळे संपूर्ण जगासह भारताची चिंता वाढली आहे. प्रशांत महासागरात वेगाने वाढत असलेल्या