मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक
मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (दि. ६) उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान ‘अप’ व ‘डाऊन’ धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान हा ब्लॉक असेल. (Mumbai Local Train)
मेन लाईनवर सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ धीमे मार्ग बंद राहतील. या काळात धीम्या मार्गावरील लोकल गाड्या सीएसएमटी आणि विद्याविहारदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या सर्व मुख्य स्थानकांवर थांबतील. हार्बर मार्गावर सकाळी ११:४० ते सायंकाळी ४:४० पर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन मार्ग आणि सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० पर्यंत चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप मार्ग बंद राहील. यामुळे सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेल, गोरेगाव आणि वांद्रेკडे जाणाऱ्या तसेच तिकडून येणाऱ्या सर्व हार्बर लोकल फेऱ्या रद्द राहतील. (Mumbai Local Train)
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची ...
प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष गाड्या चालवल्या जातील. तसेच हार्बरवरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल, तर ट्रान्स-हार्बर आणि उरण मार्गावरील गाड्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील. (Mumbai Local Train)
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक
रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात रविवार, ६ सप्टेंबर रोजी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत म्हणजेच पाच तासांचा जम्बो ब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल गाड्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय फेऱ्या रद्द राहतील, तर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या वाड्रा किंवा दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करून परत पाठवल्या जातील. प्रभावित होणाऱ्या लोकल गाड्यांची सविस्तर यादी संबंधित उपनगरीय स्थानकांच्या स्टेशन मास्टरांकडे उपलब्ध असेल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Local Train)





