Friday, September 4, 2026

Solapur Crime : सोलापुरात खळबळ! ५० ते ६० लोकांसमोर माजी नगरसेवकावर भररस्त्यात कोयत्याने प्राणघातक हल्ला; सीसीटीव्ही समोर

Solapur Crime : सोलापुरात खळबळ! ५० ते ६० लोकांसमोर माजी नगरसेवकावर भररस्त्यात कोयत्याने प्राणघातक हल्ला; सीसीटीव्ही समोर

Solapur : सोलापूर शहरात दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोलापूरमध्ये एका माजी नगरसेवकावर भरदिवसा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. ५० ते ६० लोकांच्या गर्दीसमोर एका वयोवृद्ध हल्लेखोराने माजी नगरसेवकावर कोयत्याने सपासप वार केले. या थरारक घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली असून, या संपूर्ण हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली थरारक घटना

सामने आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, हल्लेखोर वयोवृद्ध व्यक्तीने अगदी नियोजनबद्धरीत्या येत नागरिकांसमोरच माजी नगरसेवकावर कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर मारेकरी तिथून थांबला नाही, तर त्याने आपल्या जुन्या हिरो होंडा दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे, पळून जाताना त्याची गाडी तात्काळ सुरू होत नव्हती, त्यामुळे त्याने गाडी ढकलत तिथूनळ पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या माजी नगरसेवकांवर सोलापुरातील आसरा चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या पूर्ववैमनस्यातून किंवा वादातून झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जखमी माजी नगरसेवकाने आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे फरार झालेल्या वयोवृद्ध मारेकऱ्याचा कसून शोध सुरू केला आहे. भररस्त्यात घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे सोलापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >