Bharat Gogawale : सप्टेंबर संपण्याआधी महामंडळांचे वाटप होईल!

- मंत्री भरत गोगावले; रोजगार हमी योजनेचे केंद्राकडे ३ हजार कोटी रुपये रखडल्याची माहिती


मुंबई : सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी राज्यातील महामंडळांचे वाटप पूर्ण होईल, अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी शुक्रवारी दिली. महामंडळ वाटपाबाबत नेत्यांमध्ये पूर्ण एकमत असून, समन्वय समितीची बैठक पार पडल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.



मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेविषयी विचारले असता गोगावले म्हणाले, शरद पवार यांनी भूतकाळात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवे होते. तेव्हाच हे झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. तसेच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना, कायद्याच्या चौकटीत राहून तज्ज्ञ मंडळी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची कसून तपासणी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.



दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या ठेकेदारांच्या प्रलंबित बिलांवर भाष्य करताना गोगावले म्हणाले की, रोहयोची सुमारे ३ हजार कोटी रुपयांची रक्कम केंद्राकडे रखडली आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून ही रक्कम लवकरच महाराष्ट्राला प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निधी प्राप्त झाल्यानंतर अनेक योजनांमधील प्रलंबित देयके चुकती केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nashik : कळवण आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई, दोन जण निलंबित

Nashik : नाशिकच्या कळवण तालुक्यातील विसरवाडी येथील शासकीय आश्रमशाळेतील (Government Ashram School Visarwadi) आठ वर्षीय विद्यार्थिनी सृष्टी

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Anna Bansode : दादर चैत्यभूमी - इंदूमिल रस्ता रुंदीकरणासाठी अंदाजपत्रक तातडीने तयार करा - अण्णा बनसोडे

मुंबई : दादर येथील चैत्यभूमीपासून इंदूमिलपर्यंत जाणाऱ्या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाचे अंदाजपत्रक

Mumbai Valsad passenger gambling video : मुंबई-वलसाड पॅसेंजर ट्रेनमध्ये जुगाराचा खेळ अन् सीटवर चक्क... व्हायरल व्हिडिओने खळबळ!

मुंबई : मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते वलसाड (Walsad) दरम्यान जाणाऱ्या ५९०२३ जलद पॅसेंजर ट्रेनमध्ये काही प्रवाशांकडून चक्क

Ahilyanagar Crime : नशेसाठी वापरले जाणारे ४० इंजेक्शन जप्त, तीन जण ताब्यात

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातून अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. समाज माध्यमाच्या माध्यमातून

BCCI Action 62 Players : BCCI ची धडक कारवाई; रोहितसह ६२ खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी, अंडर-१९ वर्ल्ड कप विजेत्याचाही समावेश

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वयाची खोटी कागदपत्रे आणि चुकीच्या नोंदी सादर