Friday, September 4, 2026

Indian Army : भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद, नदीत वाहून गेले

Indian Army : भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद, नदीत वाहून गेले

नवी दिल्ली : हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील हथनीकुंड बॅरेज येथे सराव सुरू असताना एक अपघात झाला. या अपघातामुळे यमुनेच्या प्रवाहात वाहून गेल्याने भारतीय लष्कराच्या विशेष दलातील (१ पॅरा) दोन जवान शहीद झाले.

लष्कराच्या १ पॅरा एसएफमधील पाच जवानांचे एक पथक यमुना नदीत नांगरलेल्या लष्करी बोटीवर चिनूक हेलिकॉप्टरमधून उडी मारून मदतकार्याचा सराव करणार होते. पण आयत्यावेळी इंजिन बिघडले आणि बोट उलटली. यामुळे दोन जवान यमुनेच्या प्रवाहात वाहून गेले. तातडीने शोध मोहीम राबवून वाहून गेलेल्या जवानांचे मृतदेह शोधण्यात आले.

एका जवानाचा मृतदेह प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुनेत उत्तर प्रदेश सीमेजवळ सापडला तर दुसऱ्याचा मृतदेह जींद जिल्ह्यात हांसी शाखेत कालव्यात मिळाला. एसडीआरएफ, सैन्याची पथके तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी संयुक्तपणे शोध घेऊन वाहून गेलेल्या दोन्ही जवानांचे मृतदेह शोधले. वाहून गेलेल्या दोन जवानांपैकी शहीद नायक अजय कुमार जम्मू कश्‍मीरच्या अखनूरमधील राखी मुट्ठी भागातील रहिवासी होते. त्यांच्यावर सैन्य इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >