Dahi Handi 2026 : ५१ लाखांची हंडी अन् १० थरांची चुरस; यंदा ठाण्यात 'ढाकुमाकुम'चा जल्लोष!

राज्यभरात आज दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून, यंदाच्या गोपाळकाळ्याचा मुख्य केंद्रबिंदू पुन्हा एकदा ठाणे शहर ठरत आहे. मुंबईतील आघाडीची गोविंदा पथके दहा थरांचा विक्रम रचण्याच्या इराद्याने ठाण्याच्या दिशेने रवाना झाली आहेत. गेल्या वर्षी 'जय जवान' आणि 'कोकण नगर' या पथकांनी १० थरांचे मानवी मनोरे रचून नवा इतिहास घडवला होता. यंदा त्यांच्यासोबतच 'आर्यन्स' हे पथकही या दहा थरांच्या शर्यतीत उतरल्यामुळे उपनगरांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.


गोविंदा पथकांनी सकाळपासूनच आपापल्या भागातील मानाच्या हंड्या फोडून उत्सवाला सुरुवात केली आहे. जय जवान गोविंदा पथकाचे महेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी येथे मानाचे पहिले थर लावल्यानंतर आणि संकटमोचन हनुमान मंदिरातील हंडी फोडल्यानंतर पथक पुढील प्रवासासाठी निघेल. या पथकासोबत तब्बल ६०० ते ७०० गोविंदा आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुमारे २००० समर्थक असून, त्यांच्या वाहतुकीसाठी बस आणि ट्रकची विशेष सोय करण्यात आली आहे.



यंदा ठाण्यातील हिरानंदानी परिसरातील दहीहंडी आयोजकांनी तब्बल ५१ लाख रुपयांचे सर्वाधिक पारितोषिक ठेवल्यामुळे ती विशेष आकर्षण ठरत आहे. याशिवाय वर्तक नगर, संस्कृती प्रतिष्ठान आणि इतर प्रमुख मानाच्या हंड्यांवर गोविंदांची तुफान गर्दी होणार आहे. दुसरीकडे, महिला गोविंदा पथकेही या उत्साहात मागे नाहीत. जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाने ६ थरांची सलामी देत ठाण्यातील विविध हंड्यांवर कौशल्य दाखवण्याची तयारी पूर्ण केली आहे.


काही मंडळांनी सुरक्षेला प्राधान्य देत मर्यादित थरांचे नियोजन केले आहे. माझगाव ताडवाडी येथील श्री दत्त क्रीडा मंडळाने सुरक्षा नियमांचे पालन करत यंदा ७ थर लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे, ९ थरांचा विक्रम २१ पेक्षा जास्त वेळा रचणाऱ्या आर्यन्स पथकाने गेल्या वर्षी राहिलेली १० थरांची कसर यंदा भरून काढण्याचा ठाम निर्धार केला आहे. एकूणच, मुंबई आणि ठाण्यात आज दिवसभर गोविंदांचा उत्साह आणि डीजेचा कडकडाट पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

Dahihandi 2026 : दहीहंडीच्या थरावर साकारली पावनखिंड; मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाच्या देखाव्याला दादरकरांची उत्स्फूर्त दाद

मुंबई : राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून, मुंबईतही ठिकठिकाणी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे

BMC Engineers Transfer : महापालिकेतील प्रमुख अभियंत्यांच्या बदल्या

पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण आणि इमारत परिरक्षण विभागात फेरबदल मुंबई (विशेष प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या

Mumbai Water Crisis : पाण्याच्या तक्रारींमागील कारणे शोधा, तक्रारींचे निराकारण झाल्यानंतर स्थानिकांशी संवाद साधा

महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या विविध

Nashik : सृष्टीच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागं, कळवणच्या आश्रमशाळांतील २४ विद्यार्थी एकाच दिवशी रुग्णालयात दाखल

Nashik : नाशिकच्या कळवण तालुक्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

DahiHandi 2026 : दहिहंडी उत्सवासाठी संभाव्य जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी महापालिका रुग्णालयात व्यवस्था 

मोफत वैद्यकीय उपचार करणार, अतिरिक्त  आयुक्त (शहर)  प्राजक्ता  लवंगारे यांचे निर्देश तब्बल १०० हून अधिक रूग्ण खाटा

Municipal Corporation New Sabhagruha : महापालिका नवीन सभागृहाचा प्रस्ताव लवकरच मंजुरीला

नवीन वास्तूत केवळ नगरसेवकांच्या ६० वाहनांचीच क्षमता नगरसेवकांची वाहने पार्क करण्याची समस्या राहणार