Apple Maps वर आता Ads! आयफोन युझर्सची चिंता वाढली; पाहा काय बदलणार ?

मुंबई : आयफोन (Iphone) वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिग्गज तंत्रज्ञान कंपनी 'ॲपल'ने (Apple) आपल्या 'ॲपल मॅप्स' (Apple Maps) या नेव्हिगेशन ॲपमध्ये अधिकृतपणे जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत हे नवीन वैशिष्ट्य टप्प्याटप्प्याने जगभरातील सर्व युझर्ससाठी लागू केले जाणार आहे. '9to5Mac' या टेक संकेतस्थळाच्या माहितीनुसार, गुगल मॅप्सप्रमाणेच या जाहिरातींवर निळ्या रंगाचा "ad" असा स्पष्ट टॅग दिसणार आहे.



ॲप वापरताना जाहिराती नेमक्या कुठे दिसतील ?



ॲपल मॅप्समध्ये प्रामुख्याने खालील दोन जागांवर या जाहिराती पाहायला मिळतील:


सर्च करण्यापूर्वी (Before Search) : युझर्स जेव्हा शोधण्यासाठी सर्च बारवर क्लिक करतील, तेव्हा खाली दिसणाऱ्या 'सजेस्टेड प्लेस' (Suggested Places) या यादीमध्ये पहिली जाहिरात दिसेल.


सर्च केल्यानंतर (After Search) : युझर्स जेव्हा एखादे विशिष्ट ठिकाण, रेस्टॉरंट किंवा मार्ग शोधतील, तेव्हा त्या शोधाशी संबंधित प्रायोजित (Sponsored) ठिकाणे निकालांमध्ये जाहिरात म्हणून वर दाखवली जातील.



युझर्सच्या गोपनीयतेचे (Privacy) काय ?


मॅप्सवर जाहिराती सुरू करताना ॲपलने आपल्या युझर्सच्या प्रायव्हसीची पूर्ण काळजी घेतल्याचा दावा केला आहे. कंपनीनुसार, युझर्सचे सध्याचे लोकेशन आणि ते पाहत असलेल्या जाहिरातींचा त्यांच्या ॲपल आयडीशी (Apple Account) कोणताही थेट संबंध जोडला जाणार नाही. युझर्सचा वैयक्तिक डेटा त्यांच्याच फोनमध्ये सुरक्षित राहील. ॲपल हा डेटा स्वतःच्या सर्व्हरवर साठवणार नाही अथवा कोणत्याही तिसऱ्या कंपनीला विकणार नाही.



९ सप्टेंबरच्या ॲपल इव्हेंटमध्ये काय खास असणार ?


दुसरीकडे, जगभरातील टेकप्रेमींचे लक्ष ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ॲपलच्या भव्य 'सप्टेंबर इव्हेंट'कडे लागले आहे. या सोहळ्यात कंपनी आपली नवी 'आयफोन १८' (iPhone 18) मालिका जगासमोर आणणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सोहळा ९ सप्टेंबरला रात्री १०:३० वाजता सुरू होईल आणि युझर्स तो युट्यूब, ॲपलची वेबसाईट व ॲपल टीव्हीवर लाईव्ह पाहू शकतील. या कार्यक्रमात नवीन आयफोनसोबतच ॲपलचा पहिलाच स्क्रीन घडी होणारा फोन म्हणजेच 'आयफोन अल्ट्रा' (iPhone Ultra) देखील लाँच होण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

Haryana Viral Video : हरियाणात महिलेचा रस्त्यावर हंगामा; Ola चालकावर दारू फेकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

हरियाणा : हरियाणातील एका वर्दळीच्या रस्त्यावर महिलेने गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

PM Narendra Modi : एसआरसीसीच्या शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; विद्यार्थ्यांशी व प्रवाशांशी साधला संवाद

नवी दिल्ली : दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (SRCC) शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी

Operation Ashdar : 'पळू शकता, पण लपून राहू शकत नाही!'; बुडगाममध्ये 'ऑपरेशन अशदर' अंतर्गत लष्कर-ए-तय्यबाचा पाकिस्तानी दहशतवादी ठार

बुडगाम : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) बुडगाम जिल्ह्यात (Budgam) सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका मोठ्या संयुक्त मोहिमेत

PM Modi Teachers Day Speech : शिक्षक दिनानिमित्त PM मोदींचा शिक्षकांशी मनमोकळा संवाद; 'स्क्रीन टाईम' आणि ड्रग्जच्या वाढत्या धोक्यावर व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी

Kerala Thrissur Car Accident : अंधार, अतिवेग अन् रस्त्यावरील निष्काळजीपणा! त्रिशूरमधील अपघातात तमिळनाडूच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

त्रिशूर : मध्य केरळमधील त्रिशूर (Keral, Thrissur) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH-66) वर शुक्रवारी रात्री उशिरा एक अत्यंत

कृष्णाच्या वेशभूषेत सजवलं, पण 'ती' एक चूक जीवघेणी ठरली, ६ वर्षीय आर्यनचा दुर्दैवी मृत्यू

Bihar : जन्माष्टमीचा सण म्हटलं की, घराघरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. अनेक पालक आपल्या मुलांना लाडक्या