मोफत वैद्यकीय उपचार करणार, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश
तब्बल १०० हून अधिक रूग्ण खाटा सज्ज
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिहंडी उत्सव हा संपूर्ण मुंबईत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गोविंदा सहभागी होत असता. मुंबई शहरांसह पूर्व व पश्चिम उपनगरांत हा दिवस ऐतिहासिक ठरावा यासाठी विविध गोविंदा पथक अथक प्रयत्न करीत असतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी दहिहंडी फोडताना एखादा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने रूग्णालयांना सज्ज राहण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. तसेच जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील रूग्णालयांचे अधिष्ठाता, मुख्य वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिक्षक यांनी गोविंदाच्या उपचारासाठी सज्ज रहावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले आहेत.
Dahi Handi 2026 : ५१ लाखांची हंडी अन् १० थरांची चुरस; यंदा ठाण्यात 'ढाकुमाकुम'चा जल्लोष!
राज्यभरात आज दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून, यंदाच्या गोपाळकाळ्याचा मुख्य केंद्रबिंदू पुन्हा एकदा ठाणे शहर ठरत आहे. मुंबईतील आघाडीची ...
मुंबई महानगरीची एक महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणा-या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालय आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच १६ उपनगरीय रूग्णालयातही १०५ रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ ते १० खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
या व्यवस्थे अंतर्गत निर्धारित पद्धतीनुसार किरकोळ जखमी झालेल्या गोविंदांवर प्रथमोपचार करुन त्यांना घरी सोडण्यात येते. तर, गंभीर जखमी आणि दीर्घकाल उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांसाठीही उपचार सुविधा देण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेने ३ पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांची यांची नियुक्ती केली आहे.
महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये सर्व औषधे, इंजेक्शन आणि सर्जीकल मटेरिअल, पीओपी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एक्स रे व इतर मशीनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व रूग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांनी या काळात दक्ष रहावे, अशा सूचनाही महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांना व आरोग्य यंत्रणेला प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत.






