मुंबई : कोणताही बॉलिवूड सुपरस्टार नसतानाही ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा आध्यात्मिक चित्रपट आता पाच आठवडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, अद्यापही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. विशाल चतुर्वेदी लिखित आणि दिग्दर्शित ‘हनुमान अंश’ हा त्यांच्या ‘डिव्हाईन डिटूर: दॅट चेंज्ड माय लाईफ’ या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकात नीम करोली बाबा यांच्या जीवनाचा आणि शिकवणीचा उल्लेख आहे. चित्रपटात शोभिनव सत्या आणि चंदन आनंद यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. (Hanuman Ansh Movie)
२९व्या दिवशी १० कोटींची कमाई
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने २९व्या दिवशी म्हणजेच पाचव्या शुक्रवारच्या दिवशी ५,०५५ शोजमधून तब्बल १० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील चित्रपटाचे एकूण ग्रॉस कलेक्शन ९७.७७ कोटी रुपये, तर नेट कलेक्शन ८२.८८ कोटी रुपये झाले आहे. विशेष म्हणजे, २८व्या दिवशी चित्रपटाची कमाई केवळ १० लाख रुपये होती. मात्र, त्यानंतर कमाईत मोठी वाढ झाली आणि पाचव्या आठवड्यातही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली. Hanuman Ansh Movie
Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता आणि ‘गुलीगत किंग’ म्हणून लोकप्रिय झालेला सूरज चव्हाणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी ...
फक्त २ कोटींच्या बजेटमध्ये ब्लॉकबस्टर
सुमारे २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘हनुमान अंश’ने आपल्या बजेटच्या तुलनेत प्रचंड कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टरच ठरलाय असं म्हणायला हरकत नाही.
‘टॉक्सिक’लाही मागे टाकलं?
२६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘टॉक्सिक’च्या तुलनेत ‘हनुमान अंश’ची २९व्या दिवसाची कमाई विशेष चर्चेत आहे. यश, कियारा अडवाणी, नयनतारा आणि तारा सुतारिया यांसारख्या कलाकारांचा समावेश असलेल्या ‘टॉक्सिक’ने दहाव्या दिवशी १.७५ कोटी रुपये कमावल्याचे आकडे आहेत. याच्या तुलनेत ‘हनुमान अंश’ने २९व्या दिवशी १० कोटींची कमाई केली. Hanuman Ansh Movie
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायकाचा कुजलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडालीआहे. समोर ...
‘हनुमान अंश’चा सिक्वेलही येणार का?
दरम्यान, दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी ‘हनुमान अंश’च्या सिक्वेलवर काम सुरू असल्याची पुष्टी केली आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर आता दुसऱ्या भागात कथा कोणत्या वळणावर जाणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. Hanuman Ansh Movie