Nepal Flood : महापुराचं थैमान ! 275 भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता, मृतांची संख्या 1344 वर

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर (Nepal-Tibet Border) २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे मोठं संकट निर्माण झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक जण अडकले असून, भारतीय नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६६ भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, तब्बल २७५ भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, चीनच्या तिबेट स्वायत्त क्षेत्रात अडकलेल्या १,९०७ भारतीय नागरिकांनी सुरक्षितपणे नेपाळच्या हद्दीत प्रवेश केला आहे. (Nepal Flood Update)



महापुरात मृतांचा आकडा १,३४४ वर


या महापुराची भीषणता यावरूनही स्पष्ट होते की, नेपाळी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत १,३४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र, संकट अद्याप टळलेलं नाही. सुमारे ५ हजार नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. (Nepal Flood Update)



भारताकडून नेपाळला मोठी मदत


या संकटाच्या काळात भारताने नेपाळच्या (Nepal) मदतीसाठी मोठं पाऊल उचललं आहे. भारताकडून आतापर्यंत सुमारे ९५ टन मदत आणि वैद्यकीय साहित्य नेपाळला पाठवण्यात आलं आहे.याशिवाय, नेपाळच्या विनंतीवरून भारताने ५४ तज्ज्ञांचं विशेष पथक पाठवलं आहे. यामध्ये ३० बोगदा बचाव तज्ज्ञ, १९ फॉरेन्सिक तज्ज्ञ (Forensic expert) आणि ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी सांगितले की, “आमच्या माहितीनुसार २७५ भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. आम्ही नेपाळ सरकारशी सतत संपर्कात असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. चीनमधील तिबेट भागात आता कोणताही भारतीय नागरिक अडकलेला नाही, याची चिनी अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.” (Nepal Flood Update)



बचावकार्यात भारतीय पथकांचं योगदान


दरम्यान , बचावकार्यात अतिरिक्त फॉरेन्सिक किट्स (Forensic kits), बेली ब्रिज आणि इतर आवश्यक साहित्यही नेपाळला पाठवण्यात येणार आहे. भारतीय बचाव आणि वैद्यकीय पथकं सध्या नेपाळच्या स्थानिक प्रशासनासोबत प्रत्यक्ष घटनास्थळी काम करत असून, बेपत्ता नागरिकांचा शोध आणि बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान, २७५ भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. भारतीय आणि नेपाळी प्रशासनाकडून बचावकार्य आणि शोधमोहीम वेगाने सुरू आहे

Comments
Add Comment

Air India Phuket Delhi Flight : एएआयबीने एअर इंडियाच्या फुकेट-दिल्ली विमानाशी संबंधित घटनेचा प्राथमिक अहवाल केला जारी

नवी दिल्ली : एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने 4 ऑगस्ट रोजी झालेल्या एअर इंडियाच्या

Driving Licence New Rules : वाहतनियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही! थेट ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द; नितीन गडकरींची नवी 'पॉइंट सिस्टीम' काय आहे ?

नवी दिल्ली : देशातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त बिघडवणाऱ्या वाहनचालकांवर कठोर चाप बसवण्यासाठी

Nepal Flood : नेपाळ पूरात बेपत्ता व्यक्तींच्या ओळखीसाठी भारताची फॉरेन्सिक मदत, डीएनए तपासणी मोफत

नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातील पीडितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी

Priyanka Chopra Karl Lagerfeld Award : ग्लोबल फॅशनविश्वात प्रियांका चोप्राचा डंका! पॅरिसमध्ये प्रदान करणार मानाचा 'कार्ल लेगरफेल्ड पुरस्कार'

पॅरिस : बॉलिवूड ते हॉलिवूड (Bollywood To Hollywood) असा प्रवास करणारी ‘ग्लोबल आयकॉन’ प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) हिने

Delhi Airport Flooded : मुसळधार पावसाने दिल्ली विमानतळ पाण्याखाली! टर्मिनलवर साचले पाणी, प्रवाशांचे हाल अन् IMD कडून 'यलो अलर्ट' जारी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा मोठा फटका

Ind vs Pak Women's Asia Cup 2026 : महामुकाबल्याचा काऊंटडाऊन! महिला आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार; सामना कधी, कुठे आणि कसा पाहाल? वाचा सविस्तर

दुबई : महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत आधीच उपांत्य फेरीत धडक मारल्यानंतर भारतीय महिला संघ आता आपल्या साखळी फेरीतील