भिवंडी : भिवंडीत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका कारमधून सुमारे ५०० किलो संशयित गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करताना चालकाने पोलिस कर्मचाऱ्याला वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भिवंडीतील करिवली रोडवरील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. पोलिस कर्मचारी अमोल साळुंखे यांना काळ्या रंगाची फियाट लिनिया कार संशयास्पदरीत्या जाताना दिसली. त्यांनी चालकाला वाहन थांबवण्याचा इशारा केला.
शेन्झेन(चीन) : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. शेन्झेन एरिनामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात या ...
मात्र, पोलिसांच्या आरोपानुसार चालकाने वाहन थांबवण्याऐवजी वेग वाढवत पोलिस कर्मचाऱ्याच्या दिशेने कार नेली. साळुंखे यांनी प्रसंगावधान राखत आपले वाहन बाजूला घेतल्याने ते बचावले. त्यानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग करून सुतार आळी परिसरातील मुरलीधर मंदिराजवळ वाहन अडवले. कारची झडती घेतल्यानंतर पोलिसांना सुमारे ५०० किलो मांस आढळून आले. पोलिसांनी ते गोमांस असल्याचे म्हटले असून, या प्रकरणातील मांसाचा स्रोत आणि त्याची वाहतूक कुठे केली जात होती, याचा तपास सुरू आहे.
गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी ...
या प्रकरणी कुर्ला पूर्व येथील २२ वर्षीय शाहिद खान याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत आणखी काही जण सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास कोलते करत आहेत.