Mumbai Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज 6 सप्टेंबर मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द


मुंबई :  आज रविवार 6 सप्टेंबर रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Mega Block )

मध्य रेल्वेवर मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक राहील. या काळात सुटणाऱ्या धीम्या लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबून पुढे पुन्हा धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ( Mumbai Local News)


हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी व वांद्रे दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत डाऊन मार्गावर आणि सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत अप मार्गावर सेवा प्रभावित राहतील. या काळात सीएसएमटीवरून वाशी, बेलापूर, पनवेल आणि वांद्रे, गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान दर 20 मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येतील.

दुसरीकडे पश्चिम रेल्वेवरही ट्रॅक आणि सिग्नलिंगच्या देखभालीसाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत 5 तासांचा जम्बोब्लॉक असेल. या काळात जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर चर्चगेटला जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे किंवा दादर स्थानकापर्यंतच चालवून तिथून परत वळवण्यात येतील. ( Railway Block 6 September)


Comments
Add Comment

DahiHandi 2026 : मुंबईत गोविंदा अपघातांची ताजी आकडेवारी समोर; जखमी गोविंदांचा आकडा 376 वर; 286 जणांना डिस्चार्ज

मुंबई : मुंबईत (Mumbai) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या गोविंदांची

Mumbai Fire : मुंबईत मध्यरात्री दोन ठिकाणी आगीच्या घटना; धारावीत गॅस सिलिंडरच्या भडक्यात दोन मुलांसह चार जण जखमी

DahiHandi 2026 : गोविंदा दुर्घटना अपडेट: केईएम रुग्णालयात सर्वाधिक जखमी; मुंबईतील रुग्णालयांची आकडेवारी समोर

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी मुंबईत सर्वत्र उत्साहाचे वाता

DahiHandi 2026 : महापौर रितू तावडेंच्या दहीहंडी उत्सवांना भेटी; KEM रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांची केली विचारपूस

मुंबई : मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी

Dahi Handi 2026 : मुंबईत तब्बल १६८ गोविंदा जखमी

मुंबईत शहरातच तब्बल १०६गोविंदा जखमी तब्बल२९ जखमी गोविंदांना रुग्णालयांत दाखल करण्याची आली वेळ मुंबई (विशेष

Mumbai Police : मुंबईत ९ ते २३ सप्टेंबरदरम्यान कडक निर्बंध; ५ पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर आणि डीजे-फटाक्यांवर बंदी

मुंबई : मुंबईत ९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत कडक प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शांतता भंग,