नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी एक बहुमजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या इमारतीत विद्यार्थी आणि पीजीमध्ये राहणारे नागरिक असल्याची प्राथमिक माहिती असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, किमान तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील मोतीबागजवळील सत्य निकेतन परिसरात, शिव मंदिराजवळ ही घटना घडली. दुपारच्या सुमारास अचानक इमारतीचा मोठा भाग कोसळला आणि काही क्षणांतच परिसरात मलब्याचा ढिगारा झाला. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एक तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली अडकले ...
प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत मोठ्या संख्येने विद्यार्थी राहत होते. काही स्थानिकांनी सुमारे ४० ते ५० विद्यार्थी इमारतीत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत, याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, अडकलेल्या व्यक्तींची अंतिम संख्या अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. या दुर्घटनेनंतर NDRF, दिल्ली अग्निशमन दल, दिल्ली पोलीस, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, MCD, CATS आणि Civil Defence यांच्या पथकांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मलबा असल्याने बचाव पथकांकडून काळजीपूर्वक तो हटवण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, हे तपासण्यासाठी बचाव पथके सातत्याने प्रयत्न करत आहेत.
जकार्ता : इंडोनेशियाच्या सुंडा सामुद्रधुनीत स्थित ‘अनाक क्राकाटोआ’ ज्वालामुखीचा रविवारी पहाटे अचानक उद्रेक झाला. या उद्रेकामुळे आकाशात तब्बल ५०,००० ...
दरम्यान, या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील इमारतही रिकामी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इमारत कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार इमारतीत बेसमेंटचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे बांधकाम आणि इमारत कोसळण्याचा काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. त्यामुळे पावसामुळेच इमारत कोसळली, असे सध्या निश्चितपणे म्हणता येणार नाही. या घटनेबाबत NSUIकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करत बचावकार्य वेगाने करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांची नेमकी संख्या आणि मृत-जखमींचा अंतिम आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, एकाचा मृत्यू आणि तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असली तरी बचावकार्य अद्याप सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तासांत या दुर्घटनेबाबत आणखी महत्त्वाचे अपडेट समोर येण्याची शक्यता आहे.





