Ashish Shelar : आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरची कामे, निर्धारित कालावधीत पूर्ण करावी; मंत्री आशिष शेलार यांनी दिले निर्देश

नागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता सांभाळण्यासाठी नागपूर येथील आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे सेंटर पूर्ण कार्यान्वित झाल्यावर शासकीय कामकाज अधिक विश्वसनीय, सुरक्षित व कार्यक्षमतेने होण्यास मदत होईल. त्यादृष्टीने येथील उर्वरित कामे निर्धारित कालावधीत गतीने पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज येथे दिले.


गड्डीगोदाम मेट्रो स्थानक येथे सुमारे १४ हजार चौरस फूट जागेत उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक आपत्ती पुनर्प्राप्ती (Disaster Recovery) डेटा सेंटरची आशिष शेलार यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील कामांचा सविस्तर आढावा घेतला. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे नोडल अधिकारी लक्ष्मीकांत त्रिपाठी, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक  संदीप बापट, महामेट्रोचे महाप्रबंधक सुधाकर उराडे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेला आपत्ती पुनर्प्राप्ती (Disaster Recovery) डेटा सेंटरचा हा प्रकल्प शासनाच्या विविध विभागांची माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार असल्याचे सांगून आशिष शेलार यांनी डेटा सेंटरची आपत्कालीन परिस्थितीतील कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना केल्या. त्यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या पुढील नियोजनाची माहिती त्यांनी घेतली.



पाहणीदरम्यान तांत्रिक चर्चा व आढावा


डेटा सेंटरच्या सुरळीत आणि अखंडित कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची मंत्री शेलार संबंधितांकडून माहिती घेतली. सर्व्हर रूम, कंट्रोल रूम तसेच महत्वाचे विविध कक्ष, इमर्जन्सी युनिट व सुरक्षेची रचना जाणून घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना येथील संपूर्ण परिसर अवगत करून दिला. येथील सर्व्हर सातत्याने थंड ठेवण्यासाठी लागणाऱ्या कूलिंग सिस्टीम आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची उपलब्धता व पर्यायी व्यवस्थेविषयी विशेष सजगता ठेवावी. येथील प्रलंबित कामांची वेळेत पूर्तता करण्यासाठी विविध विभागांमध समन्वय राखून कामाच्या गतीवर लक्ष ठेवावे असे सांगून  शेलार यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती व पुढील प्रत्येक टप्प्यातील कामांच्या नियोजनाची माहिती घेतली.

Comments
Add Comment

विद्याविहार, शीव आणि गोरेगावमधील वाहतूक कोंडी फुटणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण; ‘५९ मिनिटांत मुंबई’चे उद्दिष्ट दृष्टिपथात

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासामुळे ‘५९ मिनिटांत मुंबई’ हे उद्दिष्ट साध्य

Devendra Fadnavis : वाढवण बंदरानजीक रासायनिक उद्योगांचे मोठे केंद्र उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : जागतिक रासायनिक उत्पादन क्षेत्रात भारताला महत्त्वाचे स्थान मिळविण्याची संधी असून, संशोधन, आधुनिक

द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची अनमोल भेट; काय आहे पैठणीचं वैशिष्ट्य?

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना, काल (२१ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

Vehicle Registrations: वाहन खरेदीलाही दुष्काळाचा फटका; पुणे आघाडीवर, मुंबईत किती वाहनांची नोंदणी किती?

मुंबई: साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसरा सण अलीकडेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात साजरा केला. दसरा सणाच्या

पूर्व महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना; पायाभूत प्रकल्पांसाठी 6.17 कोटी मेट्रिक टन राखेच्या वापराचा ऐतिहासिक सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण

एसटी बसस्थानकं चकाचक ठेवण्याची जबाबदारी विभाग नियंत्रकांचीच; अस्वच्छतेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा

मुंबई: एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना