Ketan Agrawal Murder : लोहगडवर बोलावले पण तो गेला नाही... केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये बीडच्या तरुणाला अटक का झाली?


पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ( Ketan Agrawal Murder) पोलीस तपासादरम्यान एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल  (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhary) यांनी या हत्येच्या कटासाठी एकापु तिसऱ्या व्यक्तीची मदत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेच्या तब्बल 79 दिवसांनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी बीडचा मूळ रहिवासी असलेल्या रितेश हंगे याला शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



रितेश चेतन आणि सियाच्या संपर्कात होता



पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रितेश हंगे हा बालेवाडीतील एका खासगी कंपनीत काम करतो आणि तो चेतन व सियाचा वर्गमित्र आहे. पोलिसांना संशयितांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअॅप चॅटची पडताळणी करताना रितेशचा या प्रकरणातील सहभाग आढळला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रितेश हा चेतन आणि सियाच्या सतत संपर्कात होता. हत्येपूर्वी तसेच केतनच्या मृत्यूनंतरही आरोपींनी रितेशशी संपर्क साधला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन आणि सियाने रितेशला 18 जून रोजी लोहगड येथे सोबत येण्यास सांगितले होते, परंतु त्याने जाण्यास नकार दिला होता. हत्येच्या संपूर्ण कटाची कल्पना असूनही रितेशने ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलीस या संपूर्ण कटाचा सखोल तपास करत असून हत्येमागील नेमका हेतू आणि रितेशची यातील भूमिका स्पष्ट करण्याचे काम सुरू आहे.




Comments
Add Comment

Chhath Puja Train Rush : दिवाळी अन् छठपूजेचा माहोल! पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी; प्रशासनाकडून विशेष सुरक्षा उपाय लागू

पुणे : दिवाळीचा सण आणि पाठोपाठ येणारी छठपूजा यामुळे सध्या पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा अक्षरशः लोट लोटताना

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश! परदेशी महिलेच्या शरीरातून कोकेनच्या 11 कॅप्सुल ताब्यात

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली

Ashish Shelar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे भाजपला अमान्य, मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांसमोर ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून तिची सखोल चौकशी

IND vs NZ पहिल्या टी20 सामन्यात 225 धावांचा यशस्वी पाठलाग करून भारताने नोंदवले विक्रम, काय ते जाणून घ्या

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिला विजय मिळवला आहे. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचे वीज बिल शून्यावर आणणार, मंत्री पंकजा मुंडे यांचा शब्द

मुंबई: सौर ऊर्जेचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून

सात महिन्यांपासून सासवड नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना वेतनच नाही, कामगार मंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे दिले निर्देश

मुंबई: सासवड नगरपालिकेतील 230 कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा