Jai Jawan Govinda Pathak : सलग 4 वेळा प्रयत्न, तरीही जय जवान अपयशी! यंदा दहीहंडीत नक्की काय बिनसले?


 मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथकांनी उंच मानवी मनोरे रचले. मात्र दरवर्षी आपल्या विक्रमी कामगिरीने लक्ष वेधून घेणाऱ्या ठाण्याच्या प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथकासाठी यंदाचा उत्सव अपेक्षेप्रमाणे ठरला नाही. 11 थरांचा नवा इतिहास रचण्याचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या जय जवान पथकाला यंदा 10 थरांची कामगिरीही पूर्ण करता आली नाही. (Jai Jawan Govinda Pathak)



चार वेळा केला प्रयत्न



उत्सवाच्या दिवशी जय जवान पथकाने तब्बल चार वेळा 10 थरांचा मानवी मनोरा उभारण्याचा प्रयत्न केला. सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी 10 थरांचा प्रयत्न करताना तोल गेल्याने मनोरे कोसळले. दुपारी एका ठिकाणी 9 थरांचा मनोरा यशस्वीरीत्या उभा राहिला, मात्र सलामी देऊन खाली उतरताना तोल गेला. दिवसाच्या अखेरीस सरनाईकांच्या दहीहंडीत पुन्हा दोन वेळा 10 थर रचण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे दिवसभरात चार प्रयत्न करूनही पथकाला एकदाही 10 थरांची यशस्वी रचना करता आली नाही. (Govinda)


पावसामुळे अडचणीत आले खेळाडू



या कामगिरीबाबत माहिती देताना जय जवान पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले की, पथकाने गेल्या चार महिन्यांपासून जोरदार सराव केला होता. मात्र ऐनवेळी झालेल्या पावसामुळे पथकातील सुमारे 20 महत्त्वाचे खेळाडू आजारी पडले. मुख्य ठिकाणी खेळणाऱ्या गोविंदांनाच त्रास झाल्यामुळे सरावावर मोठा परिणाम झाला आणि 11 थरांची तयारी असूनही प्रत्यक्षात अपेक्षित रचना पूर्ण होऊ शकली नाही.




Comments
Add Comment

DahiHandi 2026 : मुंबईत गोविंदा अपघातांची ताजी आकडेवारी समोर; जखमी गोविंदांचा आकडा 376 वर; 286 जणांना डिस्चार्ज

मुंबई : मुंबईत (Mumbai) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या गोविंदांची

Mumbai Fire : मुंबईत मध्यरात्री दोन ठिकाणी आगीच्या घटना; धारावीत गॅस सिलिंडरच्या भडक्यात दोन मुलांसह चार जण जखमी

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज 6 सप्टेंबर मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द

मुंबई :  आज रविवार 6 सप्टेंबर रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी

DahiHandi 2026 : गोविंदा दुर्घटना अपडेट: केईएम रुग्णालयात सर्वाधिक जखमी; मुंबईतील रुग्णालयांची आकडेवारी समोर

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी मुंबईत सर्वत्र उत्साहाचे वाता

DahiHandi 2026 : महापौर रितू तावडेंच्या दहीहंडी उत्सवांना भेटी; KEM रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांची केली विचारपूस

मुंबई : मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी

Dahi Handi 2026 : मुंबईत तब्बल १६८ गोविंदा जखमी

मुंबईत शहरातच तब्बल १०६गोविंदा जखमी तब्बल२९ जखमी गोविंदांना रुग्णालयांत दाखल करण्याची आली वेळ मुंबई (विशेष