Sunday, September 6, 2026

DahiHandi 2026 : मुंबईत गोविंदा अपघातांची ताजी आकडेवारी समोर; जखमी गोविंदांचा आकडा 376 वर; 286 जणांना डिस्चार्ज

DahiHandi 2026 : मुंबईत गोविंदा अपघातांची ताजी आकडेवारी समोर; जखमी गोविंदांचा आकडा 376 वर; 286 जणांना डिस्चार्ज
मुंबई : मुंबईत (Mumbai) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या गोविंदांची संख्या आता 376 वर पोहोचली आहे. शासकीय आणि मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 376 जखमी गोविंदांची नोंद झाली आहे. यापैकी 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून 53 गोविंदा रुग्णालयात दाखल आहेत, तर 37 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. (DahiHandi 2026)

विविध शासकीय व पालिकेच्या रुग्णालयांकडून मिळालेली सविस्तर माहिती:

मध्य मुंबई रुग्णालये (CT Hospitals): जखमी – 183; दाखल – 29; उपचार सुरू – 23; डिस्चार्ज – 131
पूर्व उपनगरे रुग्णालये (ES Hospitals): जखमी – 62; दाखल – 11; उपचार सुरू – 00; डिस्चार्ज – 51
पश्चिम उपनगरे रुग्णालये (WS Hospitals): जखमी – 126; दाखल – 09; उपचार सुरू – 14; डिस्चार्ज – 103
एकूण: जखमी – 376; दाखल – 53; उपचार सुरू – 37; डिस्चार्ज – 286

सर्वाधिक जखमींची नोंद झालेली रुग्णालये:

केईएम (KEM): जखमी – 76; दाखल – 18; उपचार सुरू – 00; डिस्चार्ज – 58
नायर (Nair): जखमी – 32; दाखल – 03; उपचार सुरू – 00; डिस्चार्ज – 29
सायन (Sion): जखमी – 18; दाखल – 04; उपचार सुरू – 08; डिस्चार्ज – 06
राजावाडी (Rajawadi): जखमी – 33; दाखल – 15; उपचार सुरू – 00; डिस्चार्ज – 18
बीडीबीए रुग्णालय (BDBA Hospital): जखमी – 18; दाखल – 02; उपचार सुरू – 00; डिस्चार्ज – 16
एचबीटी ट्रॉमा (HBT Trauma): जखमी – 34; दाखल – 02; उपचार सुरू – 00; डिस्चार्ज – 32
व्ही देसाई रुग्णालय (V Desai Hosp): जखमी – 33; दाखल – 00; उपचार सुरू – 00; डिस्चार्ज – 33
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >