Suraj Chavan : कृष्णाच्या जन्मदिनी सूरजच्या घरी ‘राधा’ जन्मली; बाबा होणं ही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही...

मुंबई : बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. जन्माष्टमीच्या शुभदिनी त्यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला. विशेष म्हणजे, कृष्णाच्या जन्मदिनी त्यांच्या घरी ‘राधा’ जन्मली आहे. (Suraj Chavan)


मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर करताना सूरज चव्हाण भावुक झाला. पहिल्यांदाच बाबा झाल्याचा आनंद आणि भावना व्यक्त करत त्याने आपल्या आयुष्यातील हा खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.


बाबा झाल्यानंतर सूरज चव्हाण पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आला आहे. धुळ्यातील दहीहंडी सोहळ्याला त्याने हजेरी लावली आणि इथंच त्याने सगळ्यांना गूड न्यूज दिली. कृष्णाच्या जन्मादिवशी आपल्या घरी राधा आली, आपल्याला मुलगी झाली हे सांगताना सूरज खूपच इमोशनल झाल्याचं पाहायला मिळालं. सूरजचा या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Suraj Chavan)


व्हिडीओत सूरज सांगतो, "कृष्णजन्मोत्सवाच्या दिवशी माझ्या घरी लक्ष्मी, राधा आली. मुलगी झाली याचा मला खूप आनंद होतो आहे. वडील झाल्यावर मला आता समजतंय की, त्या भावना व्यक्त करता येत नाहीत, तर समजून घ्याव्या लागतात. माझ्यावर आता जबाबदारी आली आहे." (Suraj Chavan)

Comments
Add Comment

Poonam Pandey : पूनम पांडे म्हणतेय, ‘वेश्याव्यवसाय कायदेशीर करा’! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आता पूनम

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या दोन दिवसांत ६० कोटींचा टप्पा पार

मुंबई : लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘मिर्झापूर: द

Bigg Boss 20 Contestants List : ‘बिग बॉस 20’ सुरू होण्याआधीच स्पर्धकांची नावं चर्चेत; यंदा कोण कोण दिसणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आता आपल्या २०वा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या

Hanuman Ansh Movie : पाचव्या आठवड्यातही ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच

मुंबई : कोणताही बॉलिवूड सुपरस्टार नसतानाही ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत

मनोरंजन विश्वात खळबळ ! प्रसिद्ध गायकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; हत्येचा संशय, तपास सुरू

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायकाचा कुजलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह

Suraj Chavan : ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण झाला बाबा, जन्माष्टमीच्या मुहूर्तावर बाळाचं आगमन, बाळाचा पहिला Photo समोर

Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता आणि ‘गुलीगत किंग’ म्हणून लोकप्रिय झालेला सूरज