वुमेन्स आशिया कप २०२६ मधील ९ व्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. रोमांचक लढत होईल अशी अपेक्षा असताना टीम इंडियाने पाकिस्तानला सणसणीत चपराक मारली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानच्या संघावर अवघ्या ५५ धावांवर ऑलआऊट होण्याची नामुश्की आली. हा पाकिस्तानच्या महिला टी-२० इतिहासातील सर्वात कमी स्कोअर ठरला. (IND vs PAK Cricket Match)
शेफाली वर्माने पहिल्याच चेंडूवर सिक्स मारत पाकिस्तानला धक्का दिला. पाकिस्तानचा संघ फक्त ५५ धावांवर बाद झाला. त्यांच्या ८ खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडिया मैदानात उतरली तेव्हा ‘लेडी सेहवाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली वर्माने पहिल्याच चेंडूवर सिक्स मारत पाकिस्तानला सामन्यातून बाहेर काढले. यावर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना चांगलीच भडकली होती. (IND vs PAK Cricket Match)
दुबई : महिला आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली असून, या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ऐतिहासिक ...
कॅच पकडताच शेफालीविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशन
शेफालीने पहिल्या चेंडूवर सिक्स मारल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. त्यानंतर कर्णधार फातिमा सनाने गोलंदाजीची सूत्रे हातात घेतली. शेफालीने फातिमालाही फटकवले. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर शेफालीने तिलाच टार्गेट करण्याचे ठरवले, पण तिसरा चेंडू जास्त बाऊन्स झाल्याने शेफालीचा झेल उडाला. फातिमाने झेल पकडताच शेफालीविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशन केले. तिने शेफालीला बाहेर जाण्याचा रस्ता हाताने दाखवला. (IND vs PAK Cricket Match)
Pakistan Team Crisis: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) एका निर्णयामुळे सध्या क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या ...
फातिमाच्या सेलिब्रेशननंतर शेफालीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फातिमालाही लगेच आपली चूक कळली. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने भारताच्या तीन विकेट्स घेताना एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. फातिमाच्या सेलिब्रेशननंतर टीव्ही अँकर विवेक राजदान चांगलेच भडकले. “तुमची टीम ५५ वर ऑलआऊट झाली आणि तुम्ही शेफालीला बाहेर जायला सांगताय?” असं म्हणत अँकर विवेक यांनी पाकिस्तानला जागा दाखवली. त्याचाच व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतोय. (IND vs PAK Cricket Match)




