London flight emergency landing : लंडनला जाणाऱ्या विमानात हवेतच तांत्रिक बिघाड; बंगळुरू विमानतळावर सुरक्षित लँडिंग

बंगळुरू : बंगळुरूहून लंडनला जाणाऱ्या व्हर्जिन अटलांटिकच्या विमानात उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने विमान पुन्हा बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून विमानाने काही काळ हवेत फेऱ्या मारल्यानंतर सुरक्षित लँडिंग केली. विमानातील सुमारे २७० प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.



व्हर्जिन अटलांटिकचे बंगळुरू-लंडन विमान रविवारी सकाळी सुमारे ८.२० वाजता बंगळुरू विमानतळावरून लंडनच्या दिशेने रवाना झाले. उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे क्रूच्या लक्षात आले. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वैमानिकांनी विमान बंगळुरूकडे परत वळवण्याचा निर्णय घेतला. विमान तातडीने विमानतळावर उतरवण्याऐवजी, सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत काही काळ तुमकुरू परिसराच्या हवाई हद्दीत फेऱ्या मारत राहिले. उपलब्ध माहितीनुसार विमानाने ३० मिनिटांहून अधिक काळ हवेत घिरट्या घातल्यानंतर बंगळुरूकडे परतण्यास सुरुवात केली.


यानंतर विमानाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग केली. विमानातील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित आहेत. दरम्यान, विमानात नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे इंजिन किंवा विमानाच्या अन्य यंत्रणेत नेमकी कोणती समस्या निर्माण झाली होती, याबाबत सध्या अंदाज व्यक्त करणे टाळले जात आहे.



या घटनेनंतर विमानाची तांत्रिक तपासणी केली जाणार असून, बिघाडाचे नेमके कारण शोधले जात आहे. तसेच विमान कंपनीकडून या घटनेबाबत अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकांनी घेतलेल्या खबरदारीच्या निर्णयामुळे मोठा धोका टळला.

Comments
Add Comment

Uttar Pradesh : महोबा जिल्हा रुग्णालयात बैलांची एन्ट्री ! इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांची धावपळ; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात

India china border dispute : अरुणाचल सीमेवर भारत-चीन गतिरोध कायम, आयटीबीपी प्रमुखांचा मोठा खुलासा!

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमेवर अद्यापही तणावाचे वातावरण कायम असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

Delhi-NCR Air Pollution : दिल्ली-NCR मधील प्रदूषण रोखण्यासाठी CAQM अ‍ॅक्शन मोडमध्ये ! पंजाब-हरियाणाला पराली जाळण्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश

Delhi-NCR Air Pollution : हिवाळ्यात दिल्ली-NCR परिसरातील वायुप्रदूषणात होणारी वाढ रोखण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने

Cancer Medicine Price: कॅन्सरची औषधे स्वस्त होणार ? केंद्र सरकारचा 30% ट्रेड मार्जिनचा प्रस्ताव

Cancer Medicine Price Reduction : कर्करोगावरील उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या

Maharashtra Weather : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात उष्णता आणि दमट हवामान कायम

साखर आयातीस केंद्राकडून दोन महिन्यांची मुदतवाढ; ३१ डिसेंबरपर्यंत शून्य शुल्कात आयात

परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) दहा लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीसाठीची मुदत दोन