मुंबई : मुंबईत (Mumbai) मध्यरात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. धारावीतील (Dharavi Fire) राजीव गांधी नगर परिसरात एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण भडका उडाल्याने चार जण गंभीर जखमी झाले, तर ग्रँट रोड येथील लॅमिंग्टन रोडवर एका दुकानात आग लागल्याची घटना घडली.
घरात गॅस गळतीमुळे अचानक आग लागली
धारावीतील सायन-धारावी लिंक रोडवरील एका तीन मजली घरात मध्यरात्री गॅस गळतीमुळे अचानक आगीचा भडका उडाला. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आणि परिसरातील चार जण भाजले गेले. जखमींमध्ये पूनम जयस्वाल (30 वर्षे), रोहन गुप्ता (5 वर्षे), रुद्र गुप्ता (4 वर्षे) आणि पार्वती गांधारी (19 वर्षे) यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. (Fire News)
Mumbai Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज 6 सप्टेंबर मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द
मुंबई : आज रविवार 6 सप्टेंबर रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी ...
#WATCH | Mumbai, Maharashtra: A fire broke out at Saraswati Bhavan on Lamington Road at around 11:33 pm on September 5. The blaze was confined to a ground-floor godown of a G+1 structure. Mumbai Fire Brigade declared it Level-I. Fire brigade, police, 108 ambulance, and ward staff… pic.twitter.com/hvdrY2cb9j
— ANI (@ANI) September 5, 2026
मोबाईलच्या दुकानात आग
दुसऱ्या घटनेत मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील प्रसिद्ध लॅमिंग्टन रोडवर रात्री 11.30 वाजेच्या सुमारास एका मोबाईलच्या दुकानाला आग लागली. सरस्वती भवन येथील एका गाळ्यात ही आग लागली होती, जे गोडाऊन म्हणून वापरले जात होते. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन्ही घटनांमध्ये आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.





