Sunday, September 6, 2026

Ramdas Athawale : नशामुक्त भारत अभियान अंतर्गत उद्या इंदौर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जेन झी शी संवाद

Ramdas Athawale : नशामुक्त भारत अभियान अंतर्गत उद्या इंदौर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जेन झी शी संवाद

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा उद्या सोमवार दि. 7 सप्टेंबर रोजी इंदौर मध्ये जेन झी शी नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. नशा मुक्त समाज, नशा मुक्त भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे युवा पिढीला देणार आहेत. जेन झी च्या संवादात युवा पिढी नशा मुक्त रहावी, नशा मुक्त भारत युवा पिढीने घडवावा असे आवाहन ना. रामदास आठवले करणार आहेत.

नशामुक्त भारतच्या या मोहिमेत ना.रामदास आठवले युवा पिढी जेन झी शी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम इंदौर मध्ये लता मंगेशकर सभागृह व्हीआयपी परिसर नगर, इंदौर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात नशा मुक्त भारत अभियानात यशस्वी झालेल्या स्पर्धकांना केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची राजकीय सामाजिक वाटचाल सुरू आहे. त्यांच्या अनेक भाषणातून ते शीघ्र कविता सादर करतात. युवा पिढीला भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचे क्रांतिकारी समतावादी विचार प्रकर्षाने कळू लागलेले आहेत. त्यामुळे आंबेडकरी विचारांचा वारसा घेऊन जाणारे ना. रामदास आठवले त्यांच्या अफलातून भाषण शैलीतील शीघ्र कवितांचे आकर्षण युवा पिढीला आहे. इंदौर मधील जेन झी मोठ्या संख्येने ना. रामदास आठवले यांच्याशी संवाद करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. इंदौर मधील जेन झी सोबत ना.रामदास आठवले यांचा संवाद या कार्यक्रमाचे आकर्षण वाढले असून जेन झी शी ना. रामदास आठवले यांच्या संवादाकडे इंदौर मधील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >