Maharashtra State Marathi Film Awards 2026 : ९ सप्टेंबरला रंगणार ६२ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा; हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव

मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आयोजनाने होणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासोबतच चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. (Maharashtra State Marathi Film Awards 2026)



या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. (Maharashtra State Marathi Film Awards 2026)


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थितीत तर महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे.



महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीतील कलावंत, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेली ६१ वर्षांहून अधिक काळ सातत्याने मराठी चित्रपटकर्मींच्या कलात्मक योगदानाचा गौरव करणारा हा पुरस्कार सोहळा एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (Maharashtra State Marathi Film Awards 2026)


“महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट आणि सांस्कृतिक परंपरेला आकार देणाऱ्या दिग्गजांच्या योगदानाचे स्मरण करत, नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा देण्याचे काम या पुरस्कारांच्या माध्यमातून सातत्याने केले जाते. पुरस्कार सोहळा भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडावा, यासाठी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक तयारी करण्यात येत आहे.,” असे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले. (Maharashtra State Marathi Film Awards 2026)

Comments
Add Comment

Nora Fatehi Defamation Case : नोरा फतेही अडचणीत! ‘लेगो विमान’ म्हणणं पडलं महागात; थेट ३ कोटींचा मानहानीचा दावा

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही सध्या कायदेशीर वादात अडकली आहे. एका विमान वाहतूक कंपनीने तिच्याविरोधात गांधीनगर

Anil Kapoor : सलमान खानच्या ‘बिग बॉस’ला अनिल कपूर देणार टक्कर! १०० स्पर्धक भिडणार, २६ कोटींसाठी रंगणार बुद्धीची लढाई

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस २०’ची जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानच्या होस्टिंगमुळे या रिॲलिटी शोने

Devghar On Rent Marathi Movie : 'गौतमी पाटील'ची मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री! ‘देवघर ऑन रेंट’मधून अभिनयाच्या नव्या इनिंगला सुरुवात; अंगावर शहारे आणणाऱ्या टीझरची सर्वत्र चर्चा

मुंबई : पुढील काही महिन्यांत अनेक बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘देवघर

Popular Singer Death : कॉन्सर्टच्या काही तास आधी लोकप्रिय गायकाचा मृत्यू; तीव्र ताप आल्यानं दुबईत घेतला अखेरचा श्वास  

संगीत विश्वातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलीवूडचे दिग्गज पार्श्वगायक उदित नारायण

Mary Kom Bigg Boss 20 Entry : मेरी कोम उतरली ‘बिग बॉस २०’च्या आखाड्यात; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

मुंबई : बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम आता सलमान

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा करिअरमधून ब्रेक ! आता स्टार्टअपसाठी चाहत्यांकडे मागितल्या भन्नाट आयडिया

Abhinay Berde : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय बेर्डे सध्या एका वेगळ्याच