Breaking! दिशा सालियन प्रकरणात नवीन ट्विस्ट: सचिन वाजे माफीचा साक्षीदार? वकील निलेश ओझा यांचा खळबळजनक दावा


मुंबई :  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात एक नवी आणि मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता तुरुंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी हा दावा केला आहे.


परमबीर सिंग यांच्याकडून जीवास धोका



अॅडव्होकेट निलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची विनंती केली आहे. तसेच वाझे या प्रकरणात साक्षीदार झाल्यास त्यांना माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही ओझा यांनी केला आहे. सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून लेकीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित करत सीबीआय तपासाचे आदेश दिले होते.


पुराव्यामध्ये फेरबदल केल्याचा गंभीर आरोप



दिशा सालियान प्रकरणात सचिन वाझे यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाझे यांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रभाव पाडल्याचा आणि पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिशाच्या शवविच्छेदन अहवालातही फेरफार करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. याशिवाय दिशाला घरी नेण्यासाठी सचिन वाझे यांच्या कारचा वापर झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व सध्या आरोप असून त्यावर न्यायालयीन निर्णय येणे बाकी आहे.

या प्रकरणावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले होते. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत होते. तर ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे आरोप राजकीय द्वेषातून केले जात असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले होते. आता सचिन वाझे खरोखरच माफीचे साक्षीदार होतात का आणि यामुळे या प्रकरणाला काय नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश! परदेशी महिलेच्या शरीरातून कोकेनच्या 11 कॅप्सुल ताब्यात

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली

Mumbai Prohibitory Orders: बृहन्मुंबई हद्दीत 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई, दि. 22 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस

FDA Raids : कोकण, नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागात लाखो रुपयांचा अमानक अन्नसाठा जप्त; 11 आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई: अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात धडक

Underground Local: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, नोकरदारांना दिलासा; चर्चगेट- विरार भूमिगत रेल्वे मार्गाचा प्रस्ताव?

मुंबई: पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) चर्चगेट (Churchgate) ते विरार (Virar) स्थानकादरम्यान भूमिगत उपनगरीय रेल्वे (Underground Local) नेटवर्क

Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत थेट तिसरा क्रमांक

Mumbai News: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. IQAir च्या

Land Registration Rules : सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक, फसवणूक रोखण्यासाठी महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : सामायिक सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांत सहहिस्सेदारांची फसवणूक